Diwali Padwa 2023 esakal
संस्कृती

Diwali Padwa 2023 : आज आहे दिवाळी पाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडव्याचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Padwa 2023 : आज दिवाळी पाडवा आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या पूजेला ही खास महत्व असते. नुकताच लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात आला आहे. दिवाळी पाडव्याचा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. त्यामुळे, याचे महत्व विशेष आहे.

आपल्या देशात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि प्रकाशाचा सण होयं. यंदाची दिवाळी ही १५ नोव्हेंबरला भाऊबीज झाल्यानंतर, समाप्त होईल.

दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व आपण आज जाणून घेणार आहोत.

दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन झाले की, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ आणि खास मानला जातो.

दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.

दिवाळी पाडव्याचे महत्व काय?

दिवाळी पाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचे खास महत्व आहे. या दिवशी सोने खरेदी आवर्जून केली जाते. त्यासोबतच, नवीन वाहनाची देखील खरेदी केली जाते.

पाडव्याला सूवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. औक्षण केल्यावर पती पत्नीला भेटवस्तू देतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ देखील पाडव्याच्या दिवसापासून केला जातो. शिवाय, या दिवशी व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या, पेन इत्यादी अनेक वस्तूंची पूजा करतात.

बलिप्रतिपदा पूजा

दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या पूजेला ही खास महत्व आहे. बलिप्रतिपदेतील बळी राजाची आजच्या दिवशी खास पूजा केली जाते. हा बळी राजा शेतकऱ्यांचा राजा होता. विष्णूच्या वामन अवताराने या बळी राजाकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून त्याला मारले होते.

पंरतु, हा बळी राजा उदार होता. तो जनतेची खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे, आजच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आज ही भावाला ओवाळताना महिला आवर्जून म्हणतात की, ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT