Vasubaras 2023 esakal
संस्कृती

Vasubaras 2023 : दिवाळीचा आज पहिला दिवस वसूबारस, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

दिवाळीची सुरूवात ही वसुबारसच्या सणाने होते.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : नवरात्रौत्सवाची सांगता दसरा सणाने होते. हा दसऱ्याचा सण संपन्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी हा सण आनंदाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. या दिवाळी सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.

यंदाची दिवाळी ही आजपासून सुरू झाली असून ही दिवाळी १५ नोव्हेंबरला संपणार आहे. दिवाळीची सुरूवात ही वसुबारसच्या सणाने होते. ९ नोव्हेंबरला गुरूवारी म्हणजे आज वसूबारसचा सण आहे. आज वसूबारसची पूजा कशी करायची? या पूजेचा मुहूर्त काय? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

वसूबारस

दिवाळीची सुरूवात ही वसूबारसच्या सणाने होते. यंदा वसूबारस ही ९ नोव्हेंबरला म्हणजे आज आहे. आज हा वसूबारसचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

वसूबारसची पूजा कशी करावी ?

आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वसूबारस आहे. आज वसूबारस आणि रमा एकादशी देखील आहे. वसूबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा करतात.

लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. सायंकाळी गाय-वासराची पूजा करताना घरातील सूवासिनी गाय-वासराच्या पायांवर पाणी घालतात, हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात.

शिवाय, ज्यांच्या घरी गुरे, गाय-वासरू आहेत, त्यांच्या घरी वसूबारसच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. गाय-वासराला कुंकू-हळद आणि अक्षदा वाहिल्यानंतर त्यांना निरांजनाने ओवाळले जाते. त्यानंतर, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो गाय-वासराला खायला दिला जातो.

या दिवशी अंगणात छान रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरूवात केली जाते. रांगोळी आणि दिव्यांची सजावट केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा आजच्या दिवशी लावला जातो. तसेच, या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात.

हे पदार्थ गाय-वासराला खाऊ घातले जातात. हा सण सगळीकडे अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीची दणक्यात सुरूवात केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT