crab 
संस्कृती

आगरी समाजात दिवाळीच्या काळात घरात खेकडा जाळला जातो, कारण..

सकाळ डिजिटल टीम

दिपाली सुसर

आगरी हा समाज शेतीप्रधान आहे. त्यामुळे दिवाळीत शेतक-यांचा राजा असलेल्या बळीची ‘बलिप्रतिपदा’ मोठया उत्साहात साजरी केली जाते.

दिवाळीतल्या बलिप्रतिपदा या दिवसाचं आगरी समाजात सांस्कृतिक महत्त्व आहे.

बलिप्रतिपदेच्या दिवशी तांदळाच्या पिठाची रांगोळी काढली जाते. या रांगोळीवर 4 चौकोनात प्रत्येकी 4 शेणाचे गोळे ठेवले जातात. त्याच्या मधोमधही एक गोळा ठेवला जातो. गुराढोरांच्या शेणांचे हे गोळे म्हणजे बळीराजाचं प्रतीक.

त्या गोळयावर रानफुल ठेवून हळद-कुंकू टाकून बळीराजाची पूजा केली जाते. सोबतच शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची देखील पूजा केली जाते.

‘बळी हा शूर आणि दानशूर राजा होता. जनतेच्या सेवेसाठी तो सदैव तयार असायचा असचं बळीचं राज्य पुन्हा येवो. सारे लोक सुखी-समाधानी राहो,’ असं साकडं ते निर्मित्याकडे मागतात.

आगरी समाजात एक प्रथा आहे. ती अशी की, शेतातून सुकं गवत आणलं जातं अन् घरातील कचरा एकत्र करण्यात येतो. नंतर त्यावर एक खेकडा ठेवला जातो. (त्याला इडा-पिडेचं प्रतिक समजलं जातं ). घरातून विळा आणून तो ठेवला जातो. पुढे तो विळा आणि खेकडया सगळ्या घरांत मिरवून पणतीने तो जाळून टाकण्यात येतो.

पूजा झाल्यावर शेण घराच्या छप्परावर टाकलं जातं. यामुळे बळीराजाची कृपा आल्यावर घरावर राहते, असा समज आहे.

बलिप्रतिपदेच्या दिवशी घरात फिरवलेला खेकडा जाळल्याने इडा-पिडा टळते नि घरात बळीराजाचं राज्य येतं, असा या समाजातील लोकांचा विश्वास आहे.

त्यामुळे प्रत्येक घरी हे केलं जातं. या दिवशी आगरी महिला पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांचा साजशृंगार करतात. सण म्हणून खव्याची करंजी हा एकमेव गोड पदार्थ केला जातो. पूजा झाल्यावर सर्व जण शेतात जाऊन कामाला लागतात. हे आगरी परंपरेचं वैशिष्टय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

SCROLL FOR NEXT