Diwali Puja Sahitya esakal
संस्कृती

Diwali Festival Puja 2022 : जाणून घ्या दिवाळीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य

सकाळ डिजिटल टीम

Diwali Festival 2022 : आनंदाला उधाण आणणारा अन् लहानांपासून ते अबालवृद्धांमध्ये चैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे दिवाळी. आरोग्य, ऐश्वर्य, सुख-समृद्धीच्या प्राप्तीसाठी दिवाळीच्या शुभ पर्वात मोठ्या भक्ती भावाने धन्वंतरी, लक्ष्मी-कुबेराचे पुजन केले जाते. यंदा 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे तर 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपुजन. यादिवशी घरात मनोभावे देवाची पुजा केली जाते.

पुजेसाठी सर्व साहित्याची जमवा जमव करताना एखाद्या वस्तूचा विसर पडल्यास ऐन पुजेवेळी गोंधळ होतो. हा गोंधळ टाळण्यासाठी आजच पुजेचे सर्व साहित्याची आधिच तयारी करुन ठेवावी म्हणजे गुरुजी घरी आले कि थेट पुजेले सुरुवात करता येईल. चला तर जाणून घेऊया दिवाळीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य.

(Diwali Dhanteras Lakshmi Pujan Festival 2022 Puja Sahitya Material)

पुजेसाठी लागणारे साहित्य

श्रीफळ (नारळ) - 1, हळद, कुंकू, गुलाल, कापूर, विड्याची पाने, उदबत्ती, खडीसाखर, सुपारी- 11, सुटे नाणे, पंचरंगी धागा, हार, फुले, पंचामृत, चोपड्या (नविन वह्या), गुळ, धणे, खारीक, बदाम, हळकुंड, कमळकाकडी, ऊस, साळीच्या लाह्या, बत्तासे, फळ -5 प्रकारची, सुकामेवा, शेंदूर, दुर्वा, अत्तर, अष्टगंध, तुपाची निरांजन.

diwali festival

पुजा मुहूर्त

धनत्रयोदशी - 22 ऑक्टोबर 2022, शनिवार

* शुभ मुहूर्त - सकाळी 8.03 ते 9.20 पर्यंत

* लाभ अमृत मुहूर्त - दुपारी 1.51 पासून ते 4.35 पर्यंत

* लाभ मुहूर्त - सायंकाळी 6.12पासून ते 7.35 पर्यंत

* शुभ अमृत मुहूर्त - रात्री 9.18 पासून ते 12.14 पर्यंत

लक्ष्मीपुजन - 24 ऑक्टोबर 2022, सोमवार

* अमृत मुहूर्त - सकाळी 6.37 पासून ते 7.54 पर्यंत

* शुभ मुहूर्त - सकाळी 9.31 पासून ते 10.47 पर्यंत

* लाभ अमृत मुहूर्त - दुपारी 3.18 ते 6.01 पर्यंत

* लाभ मुहूर्त - रात्री 10.51 पासून ते 12.14 पर्यंत

माहिती - पं. विजय जोशी गुरुजी (नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT