Diwali Celebration  Sakal
संस्कृती

Diwali 2022 : दिवाळीचं वैभव अनुभवायचं; भारतातील 'ही' ठिकाणं आहेत Super

भारतातील बहुतांश शहरांमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या विविध परंपरा आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Best Diwali Destinations In India : भारतातील बहुतांश शहरांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी दिवाळी साजरी करण्याच्या विविध परंपरा असून, या काळात त्या प्रत्यक्षपणे अनुभवणे म्हणजे डोळ्याचं पारणं फेडण्यासारखेचं आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या ठिकाणी खरोखरीचं दिवाळीचं वेगळं वैभव अनुवण्यास मिळतं. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्हालाही दिवाळीचं वेगळं वैभव अनुभवायचं असेल तर, तुम्ही या ठिकाणांवर फिरण्याचं नियोजन करू शकता.

1. अयोध्या

दिवाळीची सर्वाधिक धूम ज्या ठिकाणी सर्वाधिक पाहायला मिळते, त्यात अयोध्या सर्वात प्रथम क्रमांकावर आहे. अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान असून, प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण 14 वर्षांच्या वनवास पूर्ण करून ज्यावेळी आयोध्येत परतले होते त्यावेळी जसा उत्सव साजरा केला होता. तशाच पद्धतीने येथे दरवर्षी दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीकाळात येथील लाखो लोक शरयू नदीच्या काठावर एकत्र जमतात. दिवे लावतात, पूजा करून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. हा सर्व उत्साह नक्कीच डोळ्यांचं पारण फेडणारा असाच असतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही येथे जाण्याचा प्लान करू शकता.

2. वाराणसी

वाराणसीला बनारस असेही म्हणतात. हिंदूंसाठी हे अत्यंत पवित्र स्थानांपैकी हे एक आहे. या ठिकाणी प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे तुम्हालाही यंदाची दिवाळी संस्मरणीय बनवायची असेल तर, वाराणसीला जाण्याचे नियोजन तुम्ही करू शकता. येथे दिवाळीत मोठ्या प्रमाणात घरोघरी दिवे लावले जातात. याशिवाय गंगा घाटावर मोठ्या उत्साहात आरती केली जाते. या आरतीला उपस्थित राहणे नक्कीच तुमच्या आयुष्यातील संस्मरणीय असा क्षण ठरू शकतो.

3. उदयपूर

वाराणसी, आयोध्यसह उदयपूरमध्येदेखील मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. येथील पिचोळा तलावातून दिवाळीच्या वेळी शहराचे सर्वात सुंदर दृश्य नजरेस पडते. उदयपूर हे हनिमून डेस्टिनेशन म्हणून जरी सर्वाधिक प्रसिद्ध असले तरी, दिवाळीचा उत्सव येथे अतिशय शाही पद्धतीने साजरा केला जातो.

4. जयपूर

उदयपूर व्यतिरिक्त जयपूर येथेही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे. या ठिकाणी घरोघरी, रस्त्यांवर, दुकानांवर विविध प्रकारचे दिवे लावले जातात. दिवाळीच्या काळात येथे केवळ भारतातूनच नव्हे तर, परदेशातूनही पर्यटकांची मोठी गर्दी होते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते यामुळे संपूर्ण जयपूर शहर प्रकाशमान होते जे पाहून डोळ्यांचे पारणं फिटतं. याशिवाय तुम्ही येथील ज्वेलरी बाजारपेठेलाही भेट देऊन खरेदी करू शकता.

5. गोवा

गोव्यात भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा पराभव केल्याची आठवण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. याशिवाय दरवर्षी गोव्यात एका स्पर्धेचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये लोक सर्वात मोठे आणि सर्वात भयानक असे राक्षस तयार करतात. तयार केलेले हे महाभयानक राक्षस दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच नरकासुर चतुर्दशीला जाळले जातात. त्यामुळे जर तुम्हाला यंदांची दिवाळी मौजमजा आणि परंपरेनुसार साजरी करण्याची इच्छा असेल तर, गोवा हे उत्तम डेस्टिनेशन ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT