lakshmi pujan esakal
संस्कृती

Diwali Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मी पुजनाच्या दिवशी करा हे उपाय, आर्थिक समस्यासंह इडा- पिडा टळतील

सकाळ डिजिटल टीम

Diwali Lakshmi Pujan 2022 दिवाळीचा सण साजरा करताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आनंदाला उधाण येते. दिव्यांचा लखलखाट आणि फटाक्यांची आतिषबाजीची सर्वत्र धुमधाम असते. याच दिवाळीच्या पर्वात मोठ्या भक्तीभावाने लक्ष्मी- कुबेराचे पुजन केले जाते. यंदा 24 ऑक्टोबर सोमवार रोजी लक्ष्मीपुजन आहे. आर्थिक संपन्नता लाभावी, घरात सुख शांती नांदावी यासाठी देवांना आराधना केली जाते. मात्र अनेक कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करत असतात. दिवाळीच्या दिवशी शास्त्रात सांगितलेले काही सोपे उपाय केल्यास देवीची कृपा दृष्टी सदैव आपल्यावर राहते अन् घरात सुख- समृद्धी प्राप्त होते. चला तर हे सोपे उपाय जाणून घेऊया.

1) दिवाळीला ब्रम्ह मुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करुन उगवत्या सुर्यदेवाचे दर्शन घ्यावे.

2) दिवाळीला सायंकाळी लक्ष्मीपुजन केले जाते. यादिवशी देवीची विधीव्रत पुजा संपन्न करुन चांदीच्या भांड्यात कापुर पेटवून संपुर्ण घरात फिरवावा. यामुळे घरातील इडा- पिडा नष्ट होतात.

3) दिवाळी हा दिव्यांचा दिपोत्सव आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावावा. यामुळे शारीरिक व्याधी दुर होतात.

4) लक्ष्मी पुजन करतेवेळी देवीला गुळ आणि हभऱ्याची डाळ अर्पण करावी. यासह पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. याने घरातील आर्थिक समस्या दुर होतात.,

5) लक्ष्मी पुजन करताना देवीसमोर श्री सुक्त मंत्राचे पठण करावे. यामुळे अनेक व्याधी, पिडा, आर्थिक- मानसिक ताण तणावातून मुक्तता मिळते.

माहिती विवेचन - विजय राजेंद्र जोशी गुरुजी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT