Dhebrya Esakal
संस्कृती

Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या कशा तयार करायच्या?

करायला साधा सोपा आणि खायला रुचकर अशा ढेबऱ्या या मजुरांचा खास आवडीचा पदार्थ होता.

दिपाली सुसर

कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळं या भागात वर्षभर तांदळाचे विविध पदार्थ बनविले जातात. अनेक ग्रामीण भागातही सकाळची न्याहारी म्हणूनही भाकरीच बनवली जाते. गणपतीनंतर भात कापणीला सुरुवात होते आणि दिवाळीच्या काही दिवसांआधी घरात धान्य येते. पूर्वी दिवाळीच्या दिवशीही याच धान्याचा पदार्थ केला जायचा.

या दिवसांत घरात शेतात काम करणाऱ्या मजुरांची ये जा असायची. करायला साधा सोपा आणि खायला रुचकर अशा ढेबऱ्या या मजुरांचा खास आवडीचा पदार्थ होता. पणं जसजसं भात शेतीचं प्रमाण कमी होत गेलं, तसा हा पदार्थही हळूहळू काळाच्या पडद्याआड गेला. आता फारच कमी ठिकाणी जिथे जुणे म्हातारे आहे त्याच घरात हा पदार्थ तयार होतो.

आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील तिसरी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल पारंपरिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या कशा तयार करायच्या याची सविस्तर रेसिपी पाहू या..

साहित्य

● दोन वाटी तांदळाचे पीठ

● एक वाटी गूळ

● छोटा चमचा तूप (मोहनासाठी)

● तेल तळण्यासाठी

कृतीः 

प्रथम एक वाटी पाण्यात अर्धी वाटी गूळ घालून ते गरम करावे. पाणी गरम होताना त्यात एक चमचा तूप अथवा तेल घालावे. या पाण्यात मावेल एवढे तांदळाचे पीठ (पुरीचे पीठ भिजवतो तसे जरा घट्ट) भिजवावे. त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून तळाव्यात.अशा रिती सरळ साध्या सोप्या  खायला खमंग लागणाऱ्या ढेबऱ्या तयार झालेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT