Navdurga Navshakti Sakal
संस्कृती

नंदीरूढा शैलपुत्री

नवदुर्गांचा उत्सव म्हणजे नवरात्र. शक्तिउपासनेचा हा काळ. त्यानिमित्ताने माहिती घेऊया, नवदुर्गा, नवशक्ती, आदिमातेची...

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. कल्याणी हर्डीकर

नवदुर्गांचा उत्सव म्हणजे नवरात्र. शक्तिउपासनेचा हा काळ. त्यानिमित्ताने माहिती घेऊया, नवदुर्गा, नवशक्ती, आदिमातेची...

अमरकोषात पार्वती देवीची एकूण २४ नावे आहेत. शैलपुत्री, हैमवती, दाक्षायणी, सती, पार्वती ही नावे तिची जन्मकथा सांगतात; तर शिवा, भवानी, रुद्राणी ती शिवाची पत्नी आहे, हे सांगतात. कात्यायनी, दुर्गा, चंडिका, अंबिका ही नावे तिने राक्षसवधासाठी घेतलेल्या रूपनावांकडे आपले लक्ष वेधून घेतात. महिषासुरमर्दिनी किंवा महिपमर्दिनी हेही पार्वतीचे रूप. वैदिक वाङ्‌मयात पार्वतीची अंबिका, उमा, हैमवती ही नावे आलेली आहेत, परंतु शिवपत्नीवाचक नावे वैदिक वाङ्मयात नाहीत. पौराणिकांनी मात्र गौरीसकट बाकी सर्व नावे शिवपत्नी म्हणूनच रूढ केली.

शिवशंकरांप्रमाणे माता गौरी आणि माता शैलपुत्रीचे वाहनही नंदी. नवदुर्गामध्ये पहिली दुर्गा म्हणजे शैलपुत्री. पर्वतराज हिमालयाची ही ज्येष्ठ कन्या. नवरात्र पूजनात प्रथम तिची पूजा केली जाते. उपासनेसाठी तिला प्रथम वंदन केले जाते. तिचे वाहन नंदी म्हणजे कामधेनुचा पुत्र. नंदी बैल म्हणजे वृषभ. वृषभ हा समृद्धीचा, सशक्त पौरूषाचा प्रतीक. वृषभचा अर्थ वर्षाव करणारा असाही होतो. वृषभ हा शिवाचा प्रमुख द्वारपालही होता. शिवसहस्त्रनामामध्ये शिवाचे एक नाव म्हणूनही वृषभाचा उल्लेख येतो, रामायणात वृषभाची कथा आहे. रामायणातला वृषभ कुरूप आहे. शरवनात कार्तिकेयाच्या जन्मस्थळी त्याचा निवास असताना रावण तिथे कार्तिकेयाला भेटायला येतो. नंदीला पाहून तो हसतो, माकडतोंड्या म्हणून हिणवतो, तेव्हा नंदी रावणाला शाप देतो, ‘माकडेच तुझा सर्वनाश घडवतील़.’ भागवत पुराणातही पाऊस पाडणाऱ्या इंद्राचा उल्लेख वृषभ असा आहे.

ब्रह्मदेवाने प्रदीर्घ तपानंतर रोहिणी आणि सुरभी धेनूप्रमाणेच नंदीही निर्माण केला. असा हा नंदी शैलपुत्रीचे वाहन. तिचे अस्त्र त्रिशुल. ती शिवाची अर्धागी. प्रजापती दक्ष राजाच्या यज्ञात अपमानित झालेल्या सतीने श्री शिवशंकराची अवहेलना सहन न होऊन योगाग्निच्या सामर्थ्याने स्वतःचा देह भस्मसात केला आणि पुढच्या जन्मात ही सती शैलपुत्री होऊन शंकराच्या आयुष्यात आली. (क्रमशः)

(अधिक माहिती ऐका, तनिष्का व्यासपीठाच्या फेसबुक पेजवर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT