Dream Astrology esakal
संस्कृती

Dream Astrology : कुटुंबातले मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात येतात? स्वप्नशास्त्रात त्याचा अर्थ...

काही वेळा आपल्याच परिवारातल्या मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात. स्वप्नशास्त्रात याचा अर्थ सांगण्यात आला आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Dead Person In Dream : आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडत असतात. काही लोक म्हणतात मनी वसे ते स्वप्नी दिसे. पण बऱ्याचदा असे काही स्वप्न पडतात ज्या गोष्टींचा काही अर्थच लागत नाही. पण अशा स्वप्नांचे अर्थ स्वप्नशास्त्र मात्र सांगते.

काही वेळा असं ही होतं की, आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती निधन होऊन अनेक वर्ष उलटलेली असताना अचानक स्वप्नात येते. बऱ्याचदा त्यांचा विचारही मनात नसतो, तरीही. अशा मृत पूर्वजांचे स्वप्नात येण्यामागे काही संकेत असतात असं स्वप्न शास्त्र सांगते.

स्वप्नशास्त्र सांगते की, आपल्या प्रत्येकच स्वप्नामागे भविष्याविषयी काही ना काही संकेत असतात. असाच संकेत पितरांचे स्वप्नात येण्यामागे असतात. यात पितर कोणत्या भावनेत दिसतात त्यावर तो अर्थ अवलंबून असतो.

दुःखी पितरं

जर स्वप्नात कोणी पितरं रडताना दिसत असेल तर स्वप्नशास्त्रानुसार मृत व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली आहे, असा अर्थ होतो.

पितरं रागात दिसणे

जर कुटुंबातली कोणती मृत व्यक्ती स्वप्नात तुम्हाला रागावलेली दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्याकडून असे काहीतरी घडले आहे ज्यामुळे त्यांना दुःख झाले आहे.

आनंदी पितरं दिसणे

एखादी व्यक्ती आजारपणाने निधन पावली आहे. ती जर तुमच्या स्वप्नात आनंदी दिसत असेल तर याचा अर्थ त्यांच्या आत्म्याला गती मिळाली आहे. कदाचित दुसरा जन्म मिळाला आहे.

पितरांशी बोलणे

स्वप्नात जर तुम्ही दिसलेल्या पितरांशी बोलत असाल तर, याचा अर्थ असतो की, तुमचे अडकलेले, अर्धवट काम लवकरच पूर्ण होणार आहे.

पितरांचं बोलणं न समजणे

स्वप्नात पितरांचे बोलणे न समजणे ही अशुभ गोष्ट मानली जाते. हे स्वप्न भविष्यातल्या एखाद्या नकारात्मक घटणेचे संकेत देते.

पितरांचा सल्ला

स्वप्नात मृत व्यक्तीकडून एखादा सल्ला मिळत असेल तर कदाचित ते ऐकल्याने तुम्हाला भविष्यात काहीतरी लाभ होऊ शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Child Mortality: पाच महिन्यात नागपुरात; ३९९ बालमृत्यू, २०२४ मध्ये ११७२ बालके दगावली

रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळताना दिसतील का? Shubman Gill ने स्पष्टच सांगितले, गौतम गंभीर...

MIDC Closed: विदर्भातील १ हजार २४६ उद्योग पडले बंद; उच्च न्यायालयातर्फे गंभीर दखल; उद्योगक्षेत्राची दयनीय स्थिती

Electricity Workers Strike:'राज्यातील ४२ हजार वीज कर्मचारी तीन दिवस संपावर'; सातारा जिल्ह्यातील कामगार सहभागी हाेणार, विविध प्रश्न प्रलंबित

तुळशीबाग अन् दिवाळी खरेदी... कपड्यांपासून ते स्वयंपाकघरातील वस्तूंपर्यंत सर्व काही एका ठिकाणी; पण ‘ही’ काळजी नक्की घ्या!

SCROLL FOR NEXT