Dussehra 2023 esakal
संस्कृती

Dussehra 2023 : दसऱ्याला शस्त्रांची पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्व

विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Dussehra 2023 : नवरात्रौत्सवाचा आजचा नववा दिवस आहे. हा नववा दिवस सर्वत्र महानवमी म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. १५ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली होती. नऊ दिवस सर्वत्र हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो.

या ९ दिवसांमध्ये देवीची ९ रूपांमध्ये पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. विजयादशमीला दसरा असे ही म्हटले जाते.

विजयादशमीचा सण २४ ऑक्टोबर(मंगळवारी) देशात साजरा केला जाणार आहे. सध्या सर्वत्र विजयादशमीची रेलचेल पहायला मिळत आहे. विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. ही शस्त्रांची पूजा का केली जाते ? आणि याचे महत्व काय? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पौराणिक कथा

विजयादशमीच्या २ पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी १ कथा अशी आहे की, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाने याच दिवशी लंकेत रावणाचा वध केला होता. त्यामुळे, दसऱ्याचा दिवस विजयाचे प्रतिक मानला जातो.

आता दुसरी कथा अशी आहे की, दुर्गामातेचे ९ दिवस महिषासूर या राक्षसासोबत युद्ध सुरू होते आणि अखेर दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला दुर्गामातेने महिषासुराचा वध केला.

त्यामुळे, या दिवसाला विजय आणि शौर्याचे प्रतिक मानले जाते. विजयाचे प्रतिक असलेल्या या विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे.

शस्त्रांची पूजा का केली जाते ?

वरच्या मुद्द्यामध्ये पौराणिक कथांबद्दल सांगितले. आता ही पूजा का केली जाते ? ते आपण जाणून घेऊ. विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. दसरा हा सण हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक असलेला हा सण आहे.

या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसासोबत तब्बल ९ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या असूराचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने लंकेत रावणाचा वध केला आणि सीतेला लंकेच्या बंदिवासातून मुक्त केले. या दोन्ही कथा विजयाचे आणि शौर्याचे प्रतिक दर्शवतात.

दुसरे कारण हे आहे की, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे, सम्राट युद्धाला जायचे. त्यावेळी, ते शस्त्रांची तयारी करायचे. ही तयारी केल्यानंतर युद्धाला निघण्यापूर्वी हे राजे शस्त्रांची विधिवत पूजा करायचे. खरं तर तेव्हापासून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजपर्यंत ही परंपरा सुरू आहे.

फरक इतकाच की आता शस्त्रांसोबत इतर गोष्टींची पूजा केली जाते. या गोष्टींमध्ये आता लोकांच्या उपजिवेकेचे साधन असणाऱ्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT