western  esakal
संस्कृती

Fashion Tips : फेकुन न देता एकदा ट्राय करा ‘क्रॉप टॉप विथ लेहंगा’

लेहंगा वेस्टर्न स्टाईलमध्ये रियुज केला जाऊ शकतो

सकाळ डिजिटल टीम

पुणे : लग्नात किंवा समारंभात घालण्यासाठी हौसेने लेहंगा घेतला जातो. पण, एक दिवस घालून तो तसाच पडून राहतो. अशावेळी तो फेकून दिला जातो किंवा इतर कोणाला दिला जातो. पण, हाच लेहंगा वेस्टर्न स्टाईलमध्ये रियुज केला जाऊ शकतो. तुमचा जुना लेहंगा क्रॉप टॉपवर घालता येवू शकतो. क्रॉप टॉप हा असा लेडीज वेअर आहे जो अनेक पॅटर्नच्या ड्रेसवर सहजपणे कॅरी करता येतो.

फ्लोरल क्रॉप टॉप विथ लेहंगा

फ्लोरल क्रॉप टॉप जिन्स, प्लाझो यावर घातला असेल. पण, फ्लोरल क्रॉप टॉप लेहंग्यावर ट्राय करून बघा. तो तुम्हाला एक वेगळा आणि स्टायलिश लुक देईल. फ्लोरल क्रॉप टॉप लेहेंग्यासोबत घातल्यावर अगदी भडक मेकअप करू नका. त्यावर हलका मेकअप जास्त खुलून दिसेल. त्यावर डार्क लिपस्टिक लावू शकता.

ऑफ शोल्डर क्रॉप टॉप

कोणत्याही फंक्शन किंवा ऑफिस पार्टीसाठी तुम्ही ऑफ शोल्डर क्रॉप टॉप घालू शकता. लेहेंगा किंवा लाँग स्कर्टसोबतही ट्राय करू शकता. यावर लाँग कानातले छान दिसतील.ऑफ शोल्डर क्रॉप टॉप बाजारात 400 ते 550 रुपयांना मिळतात. या टॉपमध्ये व्हरायटी पहायची असेल तर ऑनलाईन चेक करा.

वन शोल्डर डिझाइन

वन शोल्डर टॉप डिझाइनची आजकाल ट्रेंडमध्ये आहे. कमी वेळेत लेडीजच्या पसंतीस पडलेला हा पॅटर्न आहे. हे क्रॉप टॉप तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक देतात. बाजारात 300 ते 400 रुपये इतकी याची किंमत आहे. या क्रॉप टॉप विथ लेहेंग्याच्या लुकसोबत हेवी मेकअप अधिक उठून दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT