Shravan Somwar 2023 esakal
संस्कृती

Shravan Somwar 2023 : आज पहिला श्रावण सोमवार, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आवर्जून करा हे उपाय

या दिवशी काही खास उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच महादेवाची कृपा लाभेल.

सकाळ ऑनलाईन टीम

Shravan Somwar 2023 : आज २१ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार असून १७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या दिवशी शिवभक्त भक्तीभावाने पूजा करत व्रतही करतात. विवाहित स्त्रियांना हा उपवास केल्याने सुख सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे. श्रावण सोमवारचे व्रत केल्याने विवाह इच्छुकांच्या लग्नाचा योग लवकरच जुळून येतो अशीही मान्यता आहे. तेव्हा या दिवशी काही खास उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच महादेवाची कृपा लाभेल.

सोमवारी उपवास केल्याने महादेव प्रसन्न तर होतातच शिवाय महादेवाच्या पूजेसह काही खास उपाय केल्याने तुम्हाल फळ प्राप्त होते.

श्रावण सोमवारी अवश्य करा हे उपाय

जर तुम्हाला व्यवसायात यश मिळवायचे असेल तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराला केशरयुक्त दूध अर्पण करा. महादेवाला केशर प्रिय आहे असे म्हटले जाते. या उपायाने व्यवसायात आणि नोकरीत यश प्राप्त होते. (Culture)

करियरमध्ये यश मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करा. हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो.

आर्थिक समस्यांतून सुटका हवी असेल तर सोमवारी महादेवाला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल.

शारीरिक आणि मानसिक त्रासांतून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी महादेवाला चंदनाचा लेप लावा. हा उपाय केल्याने सर्व त्रासांतून मुक्ती मिळते.

महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावण सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. तसेच तुम्ही अन्नदानही करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT