Job Promotion Tips esakal
संस्कृती

Job Promotion Tips : कामाच्या ठिकाणी इंक्रीमेंट-प्रमोशन हवंय? मग आजच करा हे उपाय अन् बघा चमत्कार

How to Get Promoted : आज आपण अशा काही ज्योतिष टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला इंक्रीमेंटसह - प्रमोशनही मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Job Promotion Tips : एप्रिल महिना संपायला अवघे दोन-तीन दिवस उरलेत. तेव्हा लोकांना आशा आहे ती त्यांच्या अॅप्रेजल लेटरची. प्रत्येकाला एक चांगली इंक्रीमेंट आणि प्रमोशन हवंय. मात्र ज्योतिषशास्त्राच्या मते तुमच्या कुंडलीतील दोषांमुळे तुमच्या यशात उडथळे निर्माण होऊ शकतात. तेव्हा आज आपण अशा काही ज्योतिष टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला इंक्रीमेंटसह प्रमोशनही मिळेल.

तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी इंक्रीमेंट किंवा प्रमोशन हवं असेल तर दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन दिवा लावावा. तसेच तेथे बसून शनि मंत्राचा जाप करावा. असे केल्याने शनिचा दुष्प्रभाव कमी होतो.

नोकरीच्या ठिकाणी उन्नती हवी असेल तर रोज सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सोबतच सूर्य मंत्र आणि गायत्री मंत्राचा जाप करा. याने आयुष्यात सकारात्मकता वाढते.

नोकरीच्या पदोन्नतीसाठी कुठल्याही मंदिरात जाऊन नवग्रह अभिषेक करावा. असे केल्याने राहू केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते.सोबतच कुंडलीतील दोषही दूर होतात.

मंत्र जाप

नोकरीच्या ठिकाणी प्रगती हवी असेल तर जन्म कुंडलीतील दशम भावाच्या स्वामी मंत्रांचा जाप करावा. याने प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात.

व्यवसायात असे मिळवा यश

व्यवसाय करणाऱ्या लोकांनी प्रगतीसाठी त्यांच्या कार्य करण्याच्या ठिकाणी व्यापार वाढीच्या यंत्राची स्थापना करावी. याने व्यवसायात प्रॉफिट वाढेल. (Astrology)

डिस्क्लेमर - वरील लेख ज्योतिषशास्त्रातील सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह यास प्राधान्य देत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT