ganesh chaturthi 2023 brief information about 21 different types of plants used for worship of Lord Ganesha  sakal
संस्कृती

गणपती पर्णसाज : दूर्वा, आघाडांचे महत्त्व

श्री गणेशाच्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या २१ विविध प्रकारच्या वनस्पतींची थोडक्यात माहिती

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. कांचनगंगा गंधे, पुणे |अशोक कुमारसिंग, लखनौ

श्री गणेशाच्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या २१ विविध प्रकारच्या वनस्पतींची थोडक्यात माहिती या लेखमालेतून देणार आहोत. त्याचा हा पहिला भाग.

श्रीगणेशाची षोडशोपचार व पुष्प-पत्री पूजा म्हणजे जी सृष्टिमाता अजूनही आपल्याला भरभरून देत आहे, तिच्याबद्दलचा आदर आणि मानसन्मान. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला २१ विविध प्रकारच्या वनस्पतींच्या पत्रींनी गणेशाची पूजा करतात.

या सुमारास या वनस्पतींमधील औषधी गुणधर्म शिगेला पोहोचतात. गणेशाच्या पूजेत पहिला मान पावित्र्य, आत्मिक बल व उत्साहाचे प्रतीक असलेल्या दूर्वांच्या त्रिदळाचा! देवांना त्रास देणाऱ्या अनलासूर राक्षसाला गणेशाने गिळलं, अंगाचा दाह व्हायला लागता.

शरीराचा दाह, अतिरिक्त कडकी, त्यामुळे होणाऱ्या विकारांचे शमन करण्याची क्षमता असलेल्या दुर्वांचं महत्त्व ज्ञात असलेल्या अनेक ऋषींनी प्रत्येकी २१ दूर्वा गणेशाच्या मस्तकावर वाहिल्या आणि दाह शांत झाला, तेव्हापासून पूजेत दुर्वांचं महत्त्व सर्वाधिक!

जमिनीलगत पसरत वाढणाऱ्या दूर्वा जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन कमी करण्यात साहाय्य करतात. दुर्वांची मुळं चिवट आणि जमीन, मातीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीतली सूक्ष्म सजीव सृष्टी, जी सृष्टीतल्या अनेक घटकांचं चक्र अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत करते अशांना जीवनदान मिळतं! २१ दूर्वा भांडभर पाण्यात तास भिजत टाकून ते पाणी प्यायल्यास शरीरातली कडकी कमी होते.

आघाडा :

श्रावण-भाद्रपदात उगवणाऱ्या, १ ते ३ फूट वाढणाऱ्या आघाड्याला गौरी-गणपतीचा प्रतिनिधी मानतात. श्रावणातल्या शुक्रवारच्या ‘जिवती’ पूजेत आघाडा-दुर्वांच्या माळेला महत्त्व आहे. आघाड्यातून जो अपामार्ग सार’ काढतात तो यकृत, दातांच्या विकारांवर गुणकारी आहे. धार्मिक कार्यात, आयुर्वेदात आघाडा महत्त्वाचा आहेच, शिवाय तो सुपीक मातीचा निदर्शक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT