Ganesh Utsav Esakal
संस्कृती

Ganesh Chaturthi 2023: यंदा लाडक्या गणपती बाप्पाचं कधी होणार आगमन?

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Utsav: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त याविषयी जाणून घेऊया.

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेल्या गणपती सुख चैतन्य आणि समृद्धी घेऊन येत असतो. यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू होणार आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्थीला संपेल. या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

गणेश चतुर्थी महत्त्वाचे मुहूर्त:

मध्याह्न गणेश पूजा मुहूर्त: सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिटचतुर्थी तिथी प्रारंभ: १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटचतुर्थी तिथी समाप्ती : १९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून २३ मिनिटआदल्या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ: १८ सप्टेंबर, दुपारी १२ वाजून ३९ मिनिट ते रात्री ८ वाजून ३५ मिनिटगणेश चतुर्थी २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिट या वेळेत तुम्ही श्री गणेशजीची मूर्ती स्थापन करू शकता.

पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि वाढ होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT