Ganesh Festival 2023 esakal
संस्कृती

Ganesh Festival 2023 : प्रथम पूजेचा मान गणेशासच का? इथे वाचा सविस्तर

गणेश स्तवनाशिवाय कोणत्याही ग्रंथाची सुरुवात केलेली आढळणे विरळाच

गौरव देशपांडे

Ganesh Festival 2023 : कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी आरंभी गणेशाचे स्मरण करून ते काम करावे, असा परिपाठ आहे. किंबहुना कार्यात विघ्न येऊ नये व कार्य सिद्धीस जावे यासाठी अजूनही सर्वप्रथम गणेशाची पूजा व वंदन करायचा परिपाठ आहे. सर्व संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आरंभीही गणेशस्तवन करूनच पुढे मूळ ग्रंथास सुरुवात केलेली आढळते. किंबहुना, गणेश स्तवनाशिवाय कोणत्याही ग्रंथाची सुरुवात केलेली आढळणे विरळाच.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सर्व देवतांमध्ये गणेशासच अग्रपूजेचा मान का?

पद्मपुराण सृष्टिखंडानुसार, माता पार्वतीच्या वरदानानुसार गणेशास हा मान प्राप्त झालेला आहे. गणपतीने मातापित्यांची केलेली सेवा हे त्याचे मुख्य कारण. पद्मपुराणानुसार, सर्वप्रकारची तीर्थस्नाने, दान, यज्ञ, व्रते इत्यादी मातापितापूजनाच्या सोळाव्या हिश्शाचीदेखील बरोबरी करू शकत नाहीत. (Ganesh Chaturthi Festival)

गणपती अथर्वशीर्षातही 'ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्' असे गणेशास संबोधलेले आहे. या ओम् चा उच्चार हा सर्व मंत्रांच्या आरंभी केला जातो; किंबहुना ओम्कारास अग्रक्रम दिलेला आहे. ओम्काराचे उच्चारण न करता विशिष्ट मंत्र पठण केल्यास त्याचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही, असे मंत्रशास्त्र सांगते.

गणेश हा ओम्कारस्वरूप असल्यामुळे सर्व धार्मिक व मंगल कार्यांमध्ये त्यास अग्रक्रम दिलेला आहे, तसेच गणेशापासूनच सर्व देवतांची उत्पत्ती झाली, असे अथर्वशीर्षात सांगितलेले आहे. त्यामुळे गणेशास 'आदिदेव' असेही म्हणतात. आदिदेव असल्यामुळे गणेशाचे स्मरण सर्वप्रथम करतात. आणखी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पुराणांमध्ये गणेशाची सर्व देवतांनी स्तुती केलेली आढळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT