Ganeshotsav 2023  sakal
संस्कृती

Ganeshotsav 2023 : पावणे 2 लाख अगरबत्तीतून साकारला गणपती

Ganeshotsav 2023 : डोंबिवली मधील एचएसबी अगरबत्ती उत्सवातील कलाकृती

शर्मिला वाळुंज

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव काळात विविध वस्तूंपासून गणपती बनवत कलाकार आपल्यातील कलेची चुणूक दाखवतात. यंदा डोंबिवलीतील अगरबत्ती उत्सवात चक्क पावणे दोन लाख अगरबत्त्यांपासून आकर्षक गणपतीची कलाकृती साकारण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांत ही कलाकृती साकारण्यात आली असून ती सध्या डोंबिवलीकरांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली बालभवन येथे एचएसबीच्या वतीने अगरबत्ती उत्सव भरविण्यात आला आहे. या उत्सवात पर्यावरण पूरक विविध सुगंधाच्या अगरबत्ती मांडण्यात आल्या आहेत.

या उत्सवाचे केंद्रबिंदू ठरत आहे ते अगरबत्तीमधून साकारलेले गणेश. याविषयी माहिती देताना आशिष वैद्य म्हणाले, अगरबत्ती उत्सवाचे यंदाचे हे 10 वे वर्ष आहे. दरवर्षी काही तरी नवीन घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. अगरबत्ती पासून काही करता येईल का याचा विचार सुरू असतानाच काही आर्टिस्ट लोकांशी आम्ही बोललो. आणि अगरबत्ती मधून बाप्पा सकारायचे ठरले.

आर्टिस्ट लोकांची वेळ न मिळाल्याने आमच्या सहकाऱ्यांनीच दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत हा बाप्पा साकारला. सुमारे पावणे 2 लाख काड्यांपासून गणेशाची कलाकृती बनविण्यात आली आहे. 200 ते 225 किलो त्याचे वजन आहे. एकही अगरबत्तीची काडी एकमेकांना न चिटकवता ही गणेशाची कलाकृती साकारण्यात आली आहे असे सांगितले.

दरवर्षीच या प्रदर्शनात अगरबत्तीपासून एखादी आकर्षक कलाकृती ग्राहकांसाठी सादर केली जाते. विविध रंगांतील आणि आकारांच्या अगरबत्त्यांपासूनच या कलाकृती तयार केल्या जातात असे ते म्हणाले.

हा उत्सवाला आतापर्यंत कल्याण डोंबिवलीकरांसह ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिकांनी देखील भेट दिली आहे. हा बाप्पा लहान मोठ्यांसह साऱ्यांच्याच आकर्षणाचा विषय बनत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Stock Market Closing: दिवाळीनिमित्त बाजारात उत्साह; निफ्टी 25,843 वर बंद; उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग

Bhavish Aggarwal: ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

Viral Video : भारताचा पराभव होण्यापूर्वी विराट कोहलीने जे केलं ते... शुभमन गिल, श्रेयस अय्यरसोबतच्या कृतीची सोशल मीडियावर चर्चा

Winter Healthcare Tips: हिवाळ्यात उबदार आणि निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स; घ्या त्वचा, केस आणि आरोग्याची काळजी

SCROLL FOR NEXT