Gauri Poojan sakal
संस्कृती

Ganeshotsav Gauri : माहेरवाशिणी गौरी येती घरा

पुण्यातील संजीवनी सुमंत यांच्याकडे गौरी आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. ‘गणपती पाठोपाठ माहेरवाशिणीन गौरी घरी येतात.

नीला शर्मा

पुण्यातील संजीवनी सुमंत यांच्याकडे गौरी आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. ‘गणपती पाठोपाठ माहेरवाशिणीन गौरी घरी येतात. सुख, समाधानाने घर उजळून टाकतात, ही अनुभूतीच शब्दातीत आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संजीवनी म्हणाल्या, ‘माझ्या माहेर व सासरी, दोन्हीकडे गौरी असतात. चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर, दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी व नंतरच्या दिवशी ज्येष्ठा गौरींना आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी त्यांचे पूजन, भोजन व तिसऱ्या दिवशी विसर्जन असते. यंदाही गौरींची सर्व तयारी आमच्याकडे झालेली आहे. गुरुवारी (ता. २१) गौरी येतील.

या निमित्ताने आमचे सारे कुटुंब जमते. गौरी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतात. स्नेहभाव निर्माण करतात.‌ आमच्याकडे गौरींचे मुखवटे मी आणि प्रियंका आधी लख्ख करून ठेवतो.‌ आगमनाच्या दिवशी आम्ही प्रथेप्रमाणे गौरींना घरात आणण्याआधी, सासूबाई (मंदा) औक्षण करतात. माप ओलांडून गौरी घरात आणल्या जातात. त्यांची बाळे सोबत असतात.

यासाठी माझी लेक जान्हवी व पुतणी देविका, या दोघीही हातात बाळकृष्ण घेऊन पाठीशी असतात.‌ माझ्या लग्नाआधी सासरच्या मूळ गावी, म्हणजे सोलापूर जवळच्या कुर्डुवाडीला गौरी असत. माझ्या लग्नानंतर आजेसासूबाईंनी आमच्याकडे गौरींचे मुखवटे घ्यायला सांगितले. तेव्हापासून आमच्या घरी गौरी बसविल्या जाऊ लागल्या.’

संजीवनी यांनी सांगितले की, मी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आहे. आधुनिक काळाप्रमाणे आयुष्य चाललेले असले तरी गणपती व गौरींसारख्या जुन्या प्रथा, परंपरांमागील सकारात्मकता मला हवीहवीशी वाटते. नोकरी, व्यवसायांमुळे वेगवेगळे राहणारे भाऊ, हे सण साजरे करण्यासाठी मुख्य घरात जमतात. कमालीचा एकोपा अनुभवतात.

एकटे पडण्याच्या या काळात, आपल्या सोबत सगेसोयरे कायम आहेत; ही भावना अशा प्रसंगांनी बळावते. आपापल्या कामांमधील आव्हाने पेलण्याचा हुरूप येतो. गौरी सुखासमाधानाने जेवतात. प्रसाद म्हणून घरातील सारेजण वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वान्नांचे सेवन करतात. यात आपल्याकडील आहारशास्त्रानुसार षडरसांचे तत्त्व सांभाळले जाते.

आरोग्यदायी आहार, मंगलमय वातावरण, भक्तिभाव, परस्पर साहचर्य, सहकार्य, समन्वय, सुखसंवाद आदींमुळे मन तृप्त होते. गौरी भरल्या पोटी आशीर्वाद देत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज घर उजळून टाकते आहे, सारे काही सफल व सुमंगल होणार आहे; असा विश्वास जागृत होतो. यंदाही यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब सज्ज झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT