Ganpati 2022 Esakal
संस्कृती

Ganpati 2022: 'या' पाच आयडिया वापरून झटपट स्वच्छ करा काळी पडलेली तांब्या पितळची भांडी

गणपतीत तांब्या पितळाची पुजेची भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवावी लागतात.

सकाळ डिजिटल टीम

Ganpati 2022: गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. घरोघरी गणपतीसाठी खरेदी करण्यासह घरातल्या साफसफाईही लगबग सुरू झाली असेल. गणपतीत तांब्या पितळाची पुजेची भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवावी लागतात. महिनोंमहिने तसेच पडून राहिल्यानं ही भांडी काळपट पडलेली असतात. वारंवार घासूनही भांड्याना हवीतशी चमक येत नाही. पुजेत बहुतेक लोक वापरतात ती भांडी पितळ किंवा तांब्याची असतात. पूजेची भांडी जास्त वेळ साफ न केल्यास त्यामध्ये डाग दिसतात. जे अजिबात चांगले दिसत नाहीत आणि सहज साफ होत नाहीत. म्हणूनच या लेखात आपण तांब्या पितळाची भांडी चमकवण्यासाठी काही सोप्या आयडिया सांगणार आहोत.

तुम्ही पितळच्या भांड्याना किंवा देव देवतेच्या मूर्तीना बेकिंग सोडा आणि लिंबानेही स्वच्छ करू शकता. लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि नंतर ही पेस्ट मूर्तींवर कापडाने लावा. काही वेळ असेच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ करा.यासाठी तुम्हाला एक नवीन स्क्रॅच ब्राइट घ्यावा लागेल. त्याला सर्फ लावून पितळाची भांडी स्वच्छ करा.

पितळ आणि तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यासाठी फक्त चिंच घ्या आणि त्यात थोडे गरम पाणी घाला. काथ्याचा वापर करून या पाण्यानं भांडी घासून घ्या. त्यानंतर साध्या पाण्यानं भांडी स्वच्छ धुवा.
पूजेसाठी वापरण्यात येणारी तांबे आणि पितळेची भांडी तुम्ही पांढऱ्या व्हिनेगरने स्वच्छ करू शकता.

यासाठी थोडे पांढरे व्हिनेगर पाण्यात टाकून उकळा. आता त्यात थोडे सर्फ आणि पाणी घाला. या द्रावणाने भांडी धुतल्याने छान चमकतील. पितांबरी पावडर तुम्हाला बाजारात मिळेल.

तुम्ही स्कॉच ब्राईटमध्ये थोडी पितांबरी टाका आणि त्याने भांडी धुवा. त्यानंतर भांडी पाण्याने धुवावीत. यामुळे पूजेची भांडी चमकदार होतील. लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मीठ मिसळा आणि हे मिश्रण पितळेची भांडी आणि मूर्तींवर घासून घ्या.

नंतर भांडी कोमट पाण्याने धुवा. या सोप्या पद्धतीने, भांडी आणि मूर्ती नव्याप्रमाणे चमकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikki Bhati : CCTV फुटेज, रुग्णालयाच्या Memo ने उलघडले निक्कीच्या हत्येचे गूढ; हुंड्यासाठी होत होता छळ, पतीला होणार फाशी?

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे सहभागी होऊन दिला पाठिंबा

Ganesh Festival Men's Fashion : गणेशोत्सवात वाढवा तुमचाही रूबाब; तरूणांसाठी बेस्ट आहेत 'हे' आऊटफीट्स, दिसाल एकदम झक्कास..!

Bhadra Raj Yoga: सप्टेंबरमध्ये भद्र राजयोगामुळे मिथुनसह या 5 राशींना मिळणार यश, पैसा आणि प्रगती, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Mumbai News: 'एका क्लिकवर विसर्जन स्थळांची माहिती'; केडीएमसीची भक्तांसाठी सुविधा

SCROLL FOR NEXT