Gatari Amavasya  esakal
संस्कृती

Gatari Amavasya : गटारी अमावस्या कधी? श्रावण सुरू होण्यापूर्वी 'या' दिवशी तुम्ही नॉनव्हेजवर मारु शकता ताव!

Shravan Month : गटारी अमावस्या कधी आहे? इथे वाचा

सकाळ ऑनलाईन टीम

Shravan Month : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. आषाढ अमावस्येनंतर तब्बल ५९ दिवसांचा श्रावण महिना असणार आहे. आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते. म्हणूनच याला दीप अमावस्या असे म्हणतात. या दिवसाला आणखी एक नाव म्हणजे गटारी अमावस्या.

गटारी शब्दाची उत्पत्ती कशी झाली?

गटारी हा शब्द मूळ गतहारी हा शब्दापासून तयार झालाय. गत म्हणजे मागे सारलेला/सोडलेला आणि हारी म्हणजे आहारी या शब्दांपासून गताहारी अमावस्या हा शब्द तयार झाला. आणि पुढे याच शब्दाला बोलीभाषेत 'गटारी' असे म्हणायला सुरुवात झाली.

गटारी शब्दाचा खरा अर्थ काय?

गटारीला गतहारी असे का म्हणतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आषाढ अमावस्येपासून पुढे चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा, लसूण असे पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. यामागचं शास्त्रीय कारण असं की पावसाळ्याच्या चार महिन्यात मासेमारी बंद असते. तसेच शेतकऱ्यांची शेतीची कामेसुद्धा सुरु झालेली असतात. त्यामुळे हे चार महिने सोडून एरवी मुबलक प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची आवक कमी होते.

आणि म्हणून वर्षभर जेवताना घेतला जाणारा आहार मागे सोडून चातुर्मासात वेगळ्या पद्धतीचा आहार घेण्यास सुरुवात होते. म्हणून असावस्येचा हा दिवस गतहारी अशा नावाने ओळखला जातो. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर तो पुढे संपेपर्यंत बरेच लोक नॉनव्हेज खाणे टाळतात. मात्र श्रावण सुरु होण्याआधी नॉनव्हेजवर ताव मारला जातो. हा दिवस नेमका कधी आहे आणि तुम्हाला कोणत्या तारखेला नॉनव्हेज खाता येईल ते जाणून घेऊयात. (Gatari Amavasya)

गटारी अमावस्या २०२३ कधी आहे?

यंदा हिंदू कॅलेंडरनुसार १८ जुलैला श्रावण सुरु होत आहे. श्रावण सुरु होण्यापूर्वी १७ जुलैला आषाढी/सोमवती/दीप/गतहारी अमावस्या असणार आहे. तेव्हा १४-१६ जुलैपर्यंत तुम्ही नॉव्हेज खाऊ शकता. काही घरांत शनिवारी नॉन व्हेज खाल्ले जात नाही. तेव्हा तुम्ही १४ जुलै आणि १६ जुलै या दोन दिवशी नॉनव्हेज खाऊ शकता. (Sanskruti)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates Live: चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटले नाही जाणूनबुजून म्हंटले आहे : नरेश म्हस्के

Numerology 2025 : 'या' मूलांकाच्या मुली असतात अतिशय स्वतंत्र आणि प्रॅक्टिकल ! करिअरमध्ये आघाडीवर पण लग्नाला होतो उशीर

Video : तरुणाने गाठला निर्दयतेचा कळस ! जिवंत अजगर बाईकला बांधले, ५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अन्...व्हिडिओ व्हायरल

White Eyebrow and Beard Hair: भुवई व दाढीचे केस पांढरे होतायत? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताची वाढलीय डोकेदुखी!

SCROLL FOR NEXT