Gudi Padwa Muhurt Sakal
संस्कृती

Gudi Padwa 2022: गुढी कशी उभारावी! जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस उद्याच साजरा होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा सण उद्याच आहे. कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यावर्षी घराघरात उत्साह पाहायला मिळत आहे. लोकांनी गुढी पाडवा साजरा करण्यासाठी विविध प्लॅन्स आखले आहेत. पण गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरा पाळणे गरजेचे आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दारासमोर रांगोळी काढावी. नवीन वस्त्रे परिधान करावी. देवाची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. महत्वाचे म्हणजे दारासमोर गुढी उभारावी. गुढी उभारताना काही गोष्टी नीट लक्षात ठेवून ती उभारल्यास गुढी अतिशय छान पद्धतीने उभारता येते. आणि आपल्या संस्कृतीतल्या महत्वाच्या गोष्टी आपण नीट समजून घेतल्या तर कौशल्याने गोष्टी कशा करायच्या हेही आपल्याला कळतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला माहिती मिळेलच.

शास्त्रोक्त पद्धतीने गुढी उभारायची असेल तर या पद्धतीने उभारता येईल.

- पहिल्यांदा काठी घ्यायची. ही काठी आपण स्वच्छ धुतलेली असावी. नंतर ती कोरड्या कापडाने पुसावी.

- त्या काठीला सुशोभित करण्यासाठी पहिल्यांदा हळद लावायची. मग कुंकू लावायचं. त्यानंतर अष्टगंध लावायचं

- त्यानंतर त्याला वस्त्र बांधायचं. वस्त्र बांधायला सोपं जावं म्हणून त्याच्या छोट्या छोट्या निऱ्या करून घ्यावात.

- वस्त्राला जे काठ असतात त्या काठाची बाजू खालच्या बाजूने ठेवायची. कारण तसे दिसायला छान दिसते.

- त्यानंतर हे वस्त्र काठीला सुतळीने बांधायचे. त्यानंतर गुढीला आंब्याची डहाळी बांधून घ्यायची.

- त्यानंतर कडुनिंबाचा पाला लावायचा आहे.

- त्यानंतर गुढीला साखरेच्या गोड गाठी बांधायच्या.

- महत्वाचे म्हणजे हे सगळं एकाच सुतळीने बांधून घ्यायचं आहे. कारण असे केल्याने हे सर्व गुढीला चांगलं घट्ट बसतं.

- हे सगळं बांधून झाल्यावर त्यावर कलश बांधून ठेवायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT