Guru Purnima 2023 guru purnima keva ahe esakal
संस्कृती

Guru Purnima 2023 : कधी आहे गुरुपौर्णिमा? जाणून घ्या महत्व, तिथी अन् मुहूर्त

Guru Purnima Importance: गुरू पूजनाच्या पावन दिवशी आपले जीवन घडवणाऱ्या प्रत्येकासाठी कृतज्ञता व्यक्त करतात.

धनश्री भावसार-बगाडे

Guru Purnima Shubh Muhurat Information In Marathi : आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात.

आषाढ पौर्णिमेला महान गुरु महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. त्यानिमित्त यादिवशी गुरु पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा फार जूनी आहे.

महत्व (Guru Purnima Mahatva)

पौराणिक काळातलं एक महान व्यक्तीमत्व, ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद्भागवत अठरा पुराण अशा अद्भूत साहित्य रचना करणारे महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता असं सांगितलं जातं.

महर्षी वेदव्यास हे पराशर ऋषींचे पुत्र होते. ते त्रिकाल ज्ञानी होते असे म्हटले जाते. त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीने हे समजले होते की, कलियुगात लोकांची धर्माविषयीची आवड आणि आस्था कमी होईल.

धर्मात आवड नसल्याने माणुस नास्तिक, कर्तव्यविमुख आणि कमी आयुर्मानाचा होईल. एक मोठ्या आणि संपूर्ण वेदाचा अभ्यास करणं त्याला शक्य होणार नाही. त्यामुळे व्यासांनी वेदांना चार भागांमध्ये विभाजित केलं. ज्यामुळे अल्पमती आणि अल्प स्मरणशक्तीचे लोकही त्याचा लाभ घेऊ शकतील.

व्यासांनी वेदांना चार भागांमध्ये विभाजित केल्यावर त्याचे नाव ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे ठेवले. त्यांच्या या कार्यामुळेच ते वेद व्यास या नावाने प्रसिद्ध झाले.

त्यांनी वेदांचे ज्ञान आपले शिष्य वैशंपायन, सुमंतुमुनि, पैल आणि जैमिन यांना दिले. वेदांचे ज्ञान फार गुढ आहे. ते सहज समजण्या जोगे नाही. म्हणून महर्षी वेदव्यास यांनी ते समजेल अशा पद्धतीने कथांच्या रुपात पुराणांमध्ये ते मांडले. ज्याला पाचवा वेद म्हणूनही ओळखले जाते.

महर्षी व्यासांच्या शिष्यांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर या वेदांना अनेक शाखा, उपशाखांमध्ये विभाजित केलं. महर्षी व्यास यांनी महाभारताची रचनाही केली. त्यांना आपले आदीगुरू मानले जाते. त्यांच्या जयंतीच्या रुपात ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.

तिथी अन् मुहूर्त (Guru Purnima 2023 Tithi, Mahatva)

सुरुवात - २ जुलै २०२३ रोजी रात्री ८ वाजून २२ मिनीटांपासून ते

समाप्ती - ३ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजून ९ मिनीटांपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT