Guru Purnima 2023 esakal
संस्कृती

Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं महत्व काय? अशी करावी या दिवशी विशेष पूजा

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता.

धनश्री भावसार-बगाडे

Importance Of Guru Purnima And Puja Vidhi : हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेला खूप महत्व आहे. आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. कारण या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता असं मानलं जातं. त्यांनी महाभारत, पुराण कथा लिहिल्या आहेत, असं सांगितलं जातं.

यंदा गुरुपौर्णिमा ३ जुलै रोजी साजरी होणार आहे. या दिवशी गुरुची मनोभावे पूजा केल्याने विशेष लाभ होतो असं मानलं जातं.

गुरुपौर्णिमेचं महत्व

गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमासुद्धा म्हणतात. महर्षि वेद व्यास यांना वेदांचे ज्ञान होते. महर्षि वेद व्यास यांना ७ चिरंजीवींपैकी एक मानलं जातं. म्हणजेच ते अमर आहेत आणि आजही जिवंत आहेत असं मानलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांना भगवान विष्णूंचे रुप मानले गेले आहे.

धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी पूजा-पाठ केल्याने आणि उपवास केल्याने कुंडलीतील गुरू दोष आणि पितृदोष संपतात. याशिवाय नोकरी, व्यवसाय, करिअरमधले अडथळे दूर होतात.

अशी करा पूजा

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

  • आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे.

  • नंतर स्वच्छ कपडे घालून देवघराची नीट स्वच्छता करावी.

  • देवांना पंचामृताने अभ्यंग स्नान घालावे.

  • थोडे गंगाजल शिंपडावे.

  • त्यानंतर गुरुचे स्मरण करावे. विष्णू देवाची पूजा करावी.

या मंत्रांचे पठण अवश्य करावे

  • ओम गुरुभ्यो नमः

  • ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः

  • ओम वेदाहि गुरु देवाय विद्यहे परम गुरुवे धीमहि तन्नोः प्रचोदयात्ओ

  • म गुं गुरुभ्यो नमः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT