Guru Purnima 2024 esakal
संस्कृती

Guru Purnima 2024: यंदा गुरूपौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, धार्मिक महत्व अन् पुजेची पद्धत

Guru Purnima 2024: हिंदू धर्मामध्ये गुरूपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Guru Purnima 2024 : हिंदू धर्मामध्ये गुरूपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे. हिंदू धर्मात गुरूला देवासमान मानले जाते. गुरूला देवाचा दर्जा दिला जातो. या शुभ दिनी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. ही गुरूपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा ही गुरूपौर्णिमा रविवारी २१ जुलै २०२४ ला साजरी केली जाणार आहे.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो. या दिवशी स्नान, दानासहीत इतर गोष्टींचे ही खास महत्व आहे. असे म्हटले जाते की, गुरूच्या कृपेमुळे जीवनात सूख, शांती आणि समृद्धी येते आणि दु:खाचा नाश होतो. यंदा ही गुरूपौर्णिमा कधी आहे? त्याचा शुभ मुहूर्त काय ? आणि या दिवशी पूजा कशी करावी? चला तर मग जाणून घेऊयात.

गुरूपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी?

हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरूपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या पौर्णिमेचा शुभारंभ २० जुलैला (शनिवार) संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि २१ जुलैला (रविवार) दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होईल. त्यामुळे, उदय तिथीनुसार, गुरूपौर्णिमेचा पवित्र सण २१ जुलैला सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.

गुरूपौर्णिमेला अशी करा पूजा

  • गुरूपौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून सर्वात आधी स्नान करा.

  • त्यानंतर, स्वच्छ आणि नवीन कपडे परिधान करावे.

  • त्यानंतर, देवाचे नामस्मरण करून दिवसाची सुरूवात करावी.

  • सूर्यदेवतेला पाणी अर्पण करावे, त्यानंतर, पूजेच्या ठिकाणी बसून भगवान विष्णू आणि वेदव्यास यांच्या मूर्तीची स्थापना करावी. फोटो असेल तरी चालेल.

  • आता त्या फोटोवर किंवा मूर्तीवर फुले, धूप, दीप, अक्षता अर्पण कराव्या.

  • तुपाचा दिवा लावून आरती करा आणि मनापासून गुरूकवच पठण करावे.

  • गुरूपौर्णिमेच्या दिवशी देवाला फळे, मिठाई, खीर किंवा गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

  • या दिवशी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता किंवा ज्ञानासाठी उपयुक्त ठरलेल्या पुस्तकाची ही पूजा करू शकता.

  • या दिवशी गरीबांना अन्न, दक्षिणा, कपडे किंवा अभ्यासाशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT