Hartalika Tritiya  Esakal
संस्कृती

Hartalika Tritiya 2022: यंदा कधी आहे हरतालिका तृतीया? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

हरतालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात. कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत करतात.

सकाळ डिजिटल टीम

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केली जाते. त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरितालिका तृतीया असते. यादिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी कुमारिका आणि महिला व्रत करतात.

यंदा कधी आहे हरतालिका?

देशातील अनेक राज्यांत हरतालिका व्रत विविध पद्धतीने साजरे केले जाते. यावर्षी 30 ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया साजरी केली जाणार आहे.

हरतालिका पूजा विधी नेमका कसा करायचा?

हरतालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात. कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत करतात. या दिवशी सकाळी सर्व विधी आटोपल्यानंतर हरितालिका व्रताचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पाने अर्पण केली जातात. या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो. फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मूर्तींचं विसर्जन करून व्रत पारण केले जाते.

हरतालिकेची पौराणिक कथा नेमकी काय आहे?

पौराणिक अख्यायिकेनुसार, हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती उपवर झाली आणि नारदाच्या सांगण्यावरून पर्वतराजाने तिचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचे ठरवले. मात्र पार्वतीच्या मनात भगवान शंकर असल्यामुळे तिने आपल्या सखीकडून वडिलांना निरोप पाठवला. तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन असे तिने सांगितले. तसेच आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली आणि शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन कठोर तपस्या केली. सलग 12 वर्षे पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT