Hindu Mythology  esakal
संस्कृती

Hindu Mythology : भगवान विष्णूंनी शेष नागाची शैय्याच का निवडली? हे आहे रोमांचक कारण

आपल्या धार्मिक देवी देवतांचे वाहन किंवा आसन या सगळ्याला विशेष महत्व आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Why Lord Vishnu Sleep On Shesh Naag : हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी किंवा देवतेचे एक विशिष्ट वाहन, आसन असे ठरवून दिले आहे. प्रत्येकाचे वाहन असलेले प्राणी वेगवेगळे आहेत. श्रीगणेशाचे वाहन उंदीर, तर शंकाराचे नंदी, विष्णूचे गरुड, देवी ज्या भागात तेथील वाहन कधी वाघ, कधी सिंह, कधी मगर. तसंच प्रत्येकाचे आसनही वेगवेगळं आहे. त्यात श्री विष्णू भगवान यांचे आसन आणि शैय्या शेष नाग का आहे याविषयी आज जाणून घेऊया.

आपल्या पौराणिक कथा किंवा त्यातील देवी देवतांचे वर्णन, त्या विषयीचे श्लोक हे आपल्याला जीवनाचा गहन अर्थ समजवून सांगण्यासाठी असतात. तसेच इथेही आहे. भगवान विष्णूंचे वर्णन करणाऱ्या श्लोकावरून आपण त्यांच्या या रुपाचा नेमका अर्थ काय हे समजून घेऊया.

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम् शुभांगम् l

लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ।l

आपल्याला माहित आहे, भगवान विष्णूंना जगाचा पालन कर्ता म्हटले आहे. जेव्हा जेव्हा काही अडचणी आल्या तेव्हा तेव्हा त्यांनी अवतार घेऊन लोकांना मार्गदर्शन करून अडचणींतून मार्ग दाखवला आहे. अशा कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी मूळात व्यक्ती आतून शांत स्थिर असणे आवश्यक आहे. असा मूळातच शांत असणारे असे विष्णू भगवान असल्याचे शांताकारं या शब्दातून दर्शविण्यात आले आहे.

भुजंग म्हणजे शेष नागाची शैय्या का?

सर्वात विषारी नागांमध्ये शेष नाग सर्वश्रेष्ठ मानला जातो. अशा महाभयंकर शेषालाही गुंडाळून जे त्यावर स्वार झाले आहेत, ज्याला शरणागती पत्कारायला लावली आहे असे ते विष्णू भगवान आहेत. हे प्रतिकात्मक असून यातून मिळणारा संदेश असा - संकट कितीही मोठं असलं तरी शांत चित्त राहून त्यावर स्वार होता यायला हवं. जर तुम्हाला नेता म्हणजे मार्गदर्शक व्हायचे असेल, आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुम्ही इतरांना धीर देऊ शकले पाहिजे. त्यासाठी आधी स्वतः संकटातही न डगमगता जगता यायला हवे.

भगवान विष्णू हे विश्वाचे पालक आहे, विश्वाचा आधार आहेत. विस्तीर्ण आकाश जसे तुम्ही कोठेही जा तुमची साथ सोडत नाही तसे गगनासमान असणारे हे विष्णू भगवान तुमची साथ सोडत नाहीत. प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत आहेत.

मेघाप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करणारे आणि शामल कांतीचे भगवान विष्णू, त्यांना बघून प्रत्येकाला आनंद होतो अशा शुभ व्यक्तीमत्वाचे आहेत.

ज्यांच्याकडे धनाची,लक्ष्मीची कमी नाही. ज्यांची सकारात्मक दृष्टी, कृपा दृष्टी सर्वांचे ताप, त्रासांचे हरण करते. अशा भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी सगळेच योगी, ऋषी मूनी सारेच आतूर असतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT