Hindu Rituals
Hindu Rituals esakal
संस्कृती

Hindu Rituals : हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडण्यास परवानगी का नाही? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Hindu Rituals Women Don't Break Coconut : हिंदू धर्मात अनेक रुढी परंपरा आहेत. ज्या पिढ्या दर पिढ्या पुढे चालत आल्या आहेत. काही मान्यता आहे त्याही अशाच वर्षानुवर्षे पाळल्या जातात. पण त्या मागचे कारण आपल्याला माहित असतेच असे नाही. त्यापैकीच एक पद्धत म्हणजे महिलांनी नारळ फोडू नये. पण यामागचं कारण माहितीये?

आपण नारळाला श्रीफळ म्हणतो. त्याला फार पवित्र समजलं जातं, देवाचा दर्जा दिला जातो अन् पुजेतही ठेवलं जातं. पण ते फोडण्याची परवानगी महिलांना नाही, यामागचं कारण जाणून घेऊया.

याचा संबंध प्रजनन क्षमतेशी लावला जातो

नारळ हे बीजरुपी आहे. तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरुपातच बाळाला जन्माला घालतात. तोच संबंध नारळाशी लावला जातो. त्यामुळेच हिंदू धर्मानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही.

असं म्हटलं जातं की, एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वमित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला. त्यानंतरही त्यांच समाधान झालं नाही. त्यांनी वेगळी पृथ्वीपण निर्माण करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी पहिले मानवाच्या रुपात नारल बनवला.

त्यामुळे नारळाला मानवी रुपसुद्धा मानले जाते. नारळात तीन डोळे बनवतात. या डोळ्यांना त्रिनेत्राचे रुप मानले जाते, असे शास्त्र मानते. म्हणून महिलां त्याला हात लावत नाहीत.

इतर कारणे

अशीही एक कहाणी सांगितली जाते की, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या. या तीनही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असही म्हणतात.

नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवतांचे अस्तित्व मानले जाते. त्यामुळे नारळ महिलांपासून दूर ठेवले जाते. नारळ भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ आहे. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीऐवजी इतर कोणीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.

म्हणूनच महिलांनी नारळ फोडणं हिंदू धर्मात अशुभ मानलं गेलं आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT