Holi 2024 esakal
संस्कृती

Holi 2024 : होलिका दहनानंतर मुठभर राख बदलू शकते तुमचं नशीब, लगेच करा हा एक उपाय

राख नेमकी का उचलतात, टीळा म्हणून ती कपाळी का लावतात... माहितीये?

सकाळ ऑनलाईन टीम

Holi 2024 : होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच देशातल्या वेगवेगळ्या भागात हा सण थोड्या फार फरकाने साजरा केला जातो. यानिमित्ताने सगळे एकत्र येतात. त्यानंतर आरोळी, बोंबा ठोकत होलिका दहन करतात. यानंतर गडबड असते ती म्हणजे या धगधगत्या होळीत नारळ टाकण्याची, तिची राख उचलण्याची. पण, ही राख नेमकी का उचलतात, टीळा म्हणून ती कपाळी का लावतात... माहितीये?

होलळीची राख म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो

असं म्हणतात की शनीची महादशा असो किंवा मग राहू केतुची पिडा, मूठभर होळीची राख शिवलिंगावर लावल्यास या अडचणी दूर होतात. वैवाहिक आयुष्यात आनंदाची उधळण होते. नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतात.

होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात. आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान. इतकंच नव्हे, तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठीसुद्धा ही राख फायद्याची. यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ, राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा.

अशीही एक मान्यता आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधरण महिनाभर कपाळावर ही राख टीळा म्हणून लावावी. याचे परिणाम लगेचच दिसू लागतील. नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी. यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो. (Astrology)

तुमच्या घरात सुखशांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे, थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा. हा उपाय सकाळच्याच वेळेत करा. एक बाब लक्षात ठेवा की इतर कुणी हे पाहणार नाही. यामुळं गृहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील. (Holi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Dispute : धर्मादाय आयुक्तांकडून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश, बिल्डरच्या २३० कोटींबाबत महत्त्वाचा निर्णय

आनंदाची बातमी! 'सोलापूर जिल्ह्यातील ९९९६ लेकी लाडक्या'; एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा मिळू लागला लाभ

MSRTC: ‘लालपरी’ला यंदा प्रवाशांकडून ‘भाऊबीज’! दिवाळी सुटीत अवघ्या अकरा दिवसांत कमावले पावणेबारा कोटी

Fake Currency Racket Kolhapur : कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट, हजारोंच्या नोटांसह प्रिंटर ताब्यात; गोठ्यात करत होते कारनामा

Rishabh Pant is Back! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजांशी गमतीशीर संवाद, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT