Holi 2023  esakal
संस्कृती

Holi 2023 : कोकणातल्या शिमगोत्सवामधली अनोखी प्रथा, संकासुर !!

कोकणातला शिमगोत्सव अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kokan Holi Shimgotsav 2023 : होळी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो. पण प्रत्येक प्रांताची पद्धत आणि खासियत ही वेगवेगळीच असते. असाच कोकणातला होळीच्या काळात साजरा होणारा शिमगोत्सव अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा उत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी आणि कोकणवासीयांसाठी फार खास असतो. याचा उत्साह, खेळ, उरुस सगळंच फार जोरदार असतं.

शिमगोत्सवाची खासियत

  • सामान्यतः देवाच्या देवळात जाऊन भक्तांनी दर्शन घेण्याची आपली प्रथा आहे. पण या उत्सवात ग्रामदैवतच वाजत-गाजत ग्रामस्थांच्या भेटीला घरोघरी जातात.

  • या पालखीतले देव आपल्या पुराणात सांगितलेले ब्रम्हा, विष्णू, महेश, राम-लक्ष्मण, कृष्ण असे प्रस्थापित देव नाहीत.

  • या पालख्यांमध्ये तीन ते सहा देव असतात. यात सर्वाधिक स्त्री देवता असतात. एखादाच पुरुष देव असतो.

  • या पालखी सोबत एक राक्षस कुळातील राजा शिमगोत्सवात गावभोवनी घेतो. या राक्षसाच्या वेठीचा मार खाणं, हे आशीर्वाद समजंल जातं. 

  • हा राक्षस म्हणजे कोकणवासियांनी गेली हजारो वर्षे काळजात जपून ठेवलेला संकासूर!

  • शिमगोत्सव सुरू झाला की, कोकणात हाकारे देत संकासुराचे, गोमूचे आगमन होते. नमन, खेळ्यात, दशावतारात तो असतो.

  • पूर्ण काळा वेश, डोक्यात शंकू आकाराचा मुखवटा, कपाळावर, दंडावर, अंगावर पांढऱ्या भस्माचे पट्टे, लांबलचक पांढरी दाढी आणि त्यातून लोंबणारी लाल जीभ. कंबरेला घुंगरांचा चाळ.

  • गावाची वेस बदलते तसा या रुपात थोडाफार फरक पडतो.

  • गुहागरचा संकासुर प्रसिद्ध आहे. त्याच्या कंबरेच्या घुंगरांचा चाळ ४ किलो वजनाचा असतो. हातातली वेठी आणि त्याचा नाच पाहत रहावे असा असतो.

  • वेठी कापडाच्या चिंध्यांपासून बनवलेली असते. ती घेऊन तो गावभोवनी करत असतो.

संकासुराची कहाणी

संकासूर हा एक असूर.. त्याने ब्रम्हाचे वेद पळविले, आणि विष्णूने त्याचा मत्स्य अवतार धारण करून वध केला, अशी कथा पुराणात वाचायला मिळते.  मात्र नमनात ही कथा कधीच सादर होत नाही, आणि कधी कुणी करणारही नाही, कारण नमनात आणि कोकणच्या जीवनात संकासूर हा खलनायक नव्हे, तर तो हिरो आहे.

नमनात तर त्याचे स्थान गणपती आख्यानाआधी आले आहे. अग्रक्रम त्याला मिळाला आहे. गणपतीच्या आधी तो नाच करून जातो. रंगकर्मीच्या मतानुसार, संकासूराने ब्रम्हाचे वेद पळविले नाहीच! मुळात चारही वेद अनार्यांचीच संपत्ती होती. ते अनार्यांचा राजा संकासुराचेच होते, आणि ते ब्रम्हानेच आपले वर्चस्व प्रस्थापित करत आपल्या ताब्यात ठेवले होते. ते संकासुराला पुन्हा मिळवायचे होते. म्हणून त्याने ते मिळविलेे. येथे संघर्ष निर्माण झाला, आणि या संघर्षात संकासूराचा पराभव झाला. नेहमीप्रमाणे इतिहास हा जेत्याच्या बाजूने लिहला जातो, त्यामुळे पराभूताची बाजू दुर्लक्षित होते. येथेही संकासूराच्या बाबतीत तेच झाले असावे.

संकासूर हा राजा होता. वेद ही संपत्ती शंकासूराचीच होती. ती त्याने बहुजन वर्गात वाटली. काल, आज आणि उद्या असं तिन्ही त्रिकाळ पवित्र असणारं ज्ञानदानाचं कार्य वेदांच्या माध्यमातून संकासूराने केलं, तेही बहुजन वर्गात! म्हणून त्याला पुजले जाते. तो बाळ-गोपाळात रमतो. त्यांच्या पाठीशी लागतो. त्यांचे मनोरंजन करतो. त्यांना घाबरवतो, म्हणून काहीजण त्याला श्रीकृष्णाचा अवतारही समजात. काहीजण त्याला ग्रामदेवीचा दूत असेही म्हणतात. तर काही त्याला गावाचा रक्षक असेही म्हणतात.

संकासूराला कोकणात नवसही बोलला जातोे. यावर्षीच्या शिमग्यात बोललेला नवस पुर्ण झाला, तर पुढल्या वर्षीच्या शिमग्यात ज्यावेळी फिरते/भोवनीचे खेळे दारी येतात तेव्हा तो यथाशक्ती फेडला जातो. नवस गुळ-खोबरे या परतफेडीपासून संकासूराच्या कमरेचा चाळ, हातातली वेठी, नारळाचं तोरण, आणि जास्तीत जास्त तर संकासूरासहित येणार्‍या खेळ्याचं जेवण.. अशा स्वरूपाचेही असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT