Holi 2024 esakal
संस्कृती

Holi 2024 : धुळवड अन् रंगपंचमी नक्की फरक काय? कोणत्या दिवशी खेळावे रंग...

पण कॅलेंडरमध्ये परत ४-५ दिवसांनी रंगपंचमी दिसते, म्हणजे नक्की कधी रंग खेळावे हा प्रश्न पडत असेल ना?

सकाळ डिजिटल टीम

Difference Between Dhulwad and Rangapanchami : सध्या होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळाला जातो, पण कॅलेंडरमध्ये परत ४-५ दिवसांनी रंगपंचमी दिसते, म्हणजे नक्की कधी रंग खेळावे हा प्रश्न पडत असेल ना? खरंतर उत्तर भारतीय परंपरा नकळतपणे आपण स्वीकारल्याने पूर्वापार चालत आलेली खरी रंगपंचमी आता बदलली आहे. तरी जाणून घेऊया धुळवड आणि रंगपंचमी यात नक्की फरक काय?

धुळवड म्हणजे काय?

महाराष्ट्रातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची आहे. पण आजकाल अनेकांना धुळवड म्हणजे काय हे माहीत नसतं. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. याला धुळवड अस म्हणतात.

धुलीवंदन म्हणजे वाईट विचाराचा संहार करण्यासाठी गाईच्या पवित्र शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या एकत्र करून त्यात गाईचे तूप, कापूर, उसाचे वाढे, एरंडची फांदी या सर्व वस्तू जाळतात. अग्नी प्रजव्लित करून त्याचा धूर केल्याने वातावरण शुद्ध होते अशी भावना आहे. होळीत अन्न पदार्थाचा समावेश करतात, विशेषत: पुरणपोळीसारख्या पक्वान्नांची त्यात आहुती देतात.

रंगपंचमी केव्हा असते?

फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. पण उत्तर भारतातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पराभव भाजपच्या जिव्हारी, महायुतीत मिठाचा खडा! शिवसेना युतीधर्म पाळणार का? बन यांचा थेट शिंदेंना सवाल

Omprakash Bishnoi Viral News : सोशल मीडियावर २१ लाख फॉलोअर्स, पण निवडणुकीत मिळाली केवळ ३३ मते; राजस्थानमधील इन्फ्लुएन्सर चर्चेत

Tata Group: ट्रेंट-टायटनसह नोएल टाटा 6 कंपन्यांच्या बोर्डातून बाहेर पडणार! कारण काय? नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार?

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

Nuclear Lab Fire: अमेरिकेतील अण्विक प्रयोगशाळेत आग लागल्याने आणीबाणी जाहीर! काय आहे धोका?

SCROLL FOR NEXT