Holi Celebration esakal
संस्कृती

Holi Celebration : होळीला शेणी का जाळतात? काय आहे महत्त्व!

होळीला शेणी जाळण्याचे अनेक फायदे?वाचून तर थक्क व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

होळीचा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. हिवाळा पूर्णपणे संपतो आणि कडक उन्हाळ्याला सुरूवात होते. आपल्या संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. होळीच्या मुहूर्तावर कोणतेही शुभ काम केले जात नाही.

होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. या दिवसाबद्दल वेगवेगळ्या समजूती आहेत आणि आजही लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

होलिका दहनात शेणी जाळणे शुभ असते. अशीही एक मान्यता आहे. पण असे का केले जाते? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे? याबद्दल फार कोणाला माहीती नाही. शेणी जाळल्या तरी त्या कोणत्या शेणाच्या असाव्यात याबद्दलही शास्त्रात काही नियम दिले आहेत.

धार्मिक मान्यतांनुसार होलिका दहनात नकारात्मक गोष्टींचा नाश होतो. आणि येणाऱ्या नव्या ऋतूप्रमाणे सर्वकाही नव्याने प्रारंभ होते. म्हणूनच लोक होलिका दहनाने सर्व वाईट गोष्टी जाळून टाकतात. शेणकूट जाळण्यामागील धार्मिक श्रद्धा काय आहे हे पाहुयात.

हिंदू धर्मात गाय पूजनीय आहे आणि तिच्या शेणाची देखील पूजा केली जाते. शेणाची पोळी शुभतेचे प्रतिक मानली जाते. त्यांना जाळल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. म्हणूनच हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मृतदेहाजवळ शेणींची चिता रचली जाते.  जेणेकरून त्या व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी.

केवळ या कार्यात नाही तर कोणतेही धार्मिक कार्य असेल तर होम हवनमध्ये शेणी जाळल्या जातात. हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते आणि शेण हे पवित्रतेचे प्रतीक देखील मानले जाते. आजही ग्रामीण भागात चूल पेटवताना लोक सरपण म्हणून शेणीचा वापर करतात.

गायीच्या शेणी

शेणाचा वापर केल्याने घरात समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. अनेक वेळा गाईच्या शेणाचा वापर वनौषधी बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे होलिका दहनात शेण जाळल्यास आजूबाजूची सर्व वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा आणि वाईट रोगांचाही नाश होतो.

शेणामूळे रोग पळून जातात

शेणाच्या शेणातून निघणारा धूर वातावरणातील प्रदूषित कण नष्ट करतो. तसेच, हानिकारक जीवाणू देखील मरतात आणि शेणाच्या पोळीच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते. म्हणून ते जाळल्याने आपल्याला फायदेच होतात. त्यामुळेच आजही होलिका दहनात शेणी जाळली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT