Holi 2024 esakal
संस्कृती

Holi Muhurt : आज आहे होळी, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Holi 2024 : होळी हा आनंदाचा आणि रंगांचा उत्सव आहे. सध्या देशात या होळीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय.

Monika Lonkar –Kumbhar

Holi 2024 : भारतामध्ये विविध प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सणांपैकीच एक असलेला सण म्हणजे होळी होय. हिंदू धर्मामध्ये होळीला विशेष महत्व आहे. वसंत ऋतू सुरू झाला की, सगळ्यांना प्रतिक्षा लागते ती होळीची. होळीच्या निमित्ताने होलिका दहन केले जाते आणि होळीचे विविध रंग खेळले जाते.

फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे विविध रंग खेळले जाते. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक मानले जाते. होळी हा आनंदाचा आणि रंगांचा उत्सव आहे. त्यामुळे, संपूर्ण देशात या होळीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय.

यंदा होळी ही २४ मार्च आणि २५ मार्चला साजरी केली जाणार आहे. आज होलिका दहन आणि २५ मार्चला रंग खेळले जाणार आहेत. होळीचा शुभ मुहूर्त काय आहे? आणि विधिनुसार पूजा करण्याची पद्धत कोणती? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

होळी शुभ मुहूर्त

भारतात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. आज सगळीकडे होळीची धामधूम पहायला मिळतेय. आज होलिका दहन करण्यात येणार आहे. आज होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा सकाळी ९ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होणार असून २५ मार्चला (सोमवारी) दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता. (Holi 2024)

होळीची पूजा करण्याची पद्धत खालीलप्रमाणे :

  • होलिका दहनाची पूजा करण्यापूर्वी सर्वात आधी तुम्ही स्नान करणे गरजेचे आहे.

  • अंघोळ केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी होळी पेटवणार आहात, त्या पूजेच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्वेच्या दिशेला तोंड करून बसा.

  • होळीच्या पूजेसाठी गाईच्या शेणापासून गोवऱ्या बनवा. तसेच, शेणापासून भक्त प्रल्हादाची मूर्ती बनवा.   

  • त्यानंतर, होलिका दहनाच्या पुजेसाठी लागणारे साहित्य जसे, की, फूल, नारळ, फुलांचा हार, उदबत्ती, धूप, कापूस, गूळ, हळदी-कुंकू, मूग, बत्ताशा, गुलाल, ५-७ प्रकारची धान्ये आणि पाणी याची आधीच तयारी करून ठेवावी.

  • आता या सर्व पूजा साहित्याचा वापर करून विधीपूर्वक होलिका दहनाची पूजा करावी. पूजा केल्यानंतर, होळीला गोडाचा नैवेद्य दाखवा आणि फुले वाहा.

  • होळीच्या पूजा झाल्यानंतर, होळीला गोल प्रदक्षिणा घालताना तांब्यातील पाणी वाहावे. त्यानंतर, होलिका दहन करावे. (Method of worshiping Holi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT