Ambabai Temple esakal
संस्कृती

Ambabai Temple : शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई देवीची कशी असणार अलंकारिक पूजा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ambabai Temple : गुरुवारी पहिल्या दिवशी देवीची सिंहासनारुढ महालक्ष्मी रूपातील पूजा बांधण्यात येईल.

सकाळ डिजिटल टीम

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव जगप्रसिद्ध आहे. या मंदिरातील नऊ दिवसांतील विविधरूपी पूजा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात (Sharadiya Navratri Festival) करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा आज गुरुवारपासून जागर होणार आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या नवरात्रोत्सवात श्री अंबाबाईच्या (Ambabai Temple) विविध रूपातील अलंकारिक पूजा बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने दिली.

गुरुवारी पहिल्या दिवशी देवीची सिंहासनारुढ महालक्ष्मी रूपातील पूजा बांधण्यात येईल. दरम्यान, सकाळी तोफेच्या सलामीने मंदिरात घटस्थापना होईल. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव जगप्रसिद्ध आहे. या मंदिरातील नऊ दिवसांतील विविधरूपी पूजा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या दहा दिवसांत श्रीपूजकांकडून देवीची विविध रूपातील पूजा बांधली जाते. त्यामुळे भाविकांना आदिशक्तीची विविध रूपे पाहायला मिळतात.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नवरात्रोत्सवातील नऊ दिवस मंदिर परिसरातील मंडपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यानिमित्ताने देवीची सेवा करण्यासाठी अनेक भाविक, भजनी मंडळे व संस्था उत्सुक असतात. यंदाही ८०० हून अधिक अर्ज देवस्थान समितीकडे आले होते. यापैकी काहींना देवीची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. रोज सकाळी सहा ते सात या वेळेत संगीता रेवणकर यांचे ललितसहस्त्रनाम पठण होईल. त्यानंतर सात ते आठ यावेळेत जगदीश गुळवणी यांचे श्रीसुक्त पठण होणार आहे. सकाळी आठ नंतर दहा सत्रांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. यंदा गरुड मंडपात अभिषेक विधी होणार असल्याने सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत.

उत्सवातील श्री अंबाबाईच्या पूजा अशा

  • गुरुवारी (ता. ३) सिंहासनारुढ महालक्ष्मी (घटस्थापना)

  • शुक्रवारी (ता. ४) गजेंद्रलक्ष्मी

  • शनिवारी (ता. ५) चंद्रलंबा परमेश्वरी

  • रविवारी (ता. ६) गायत्री माता

  • सोमवार (ता. ७) सरस्वती देवी

  • मंगळवार (ता. ८) अंबारीतील गजारुढ (त्र्यंबोली भेटीसाठी)

  • बुधवार (ता. ९) महाप्रत्यांगिरा

  • गुरुवारी (ता. १०) दुर्गा माता

  • शुक्रवारी (ता. ११) महिषासुरमर्दिनी

  • शनिवारी (ता. १२) रथारूढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT