July 2025 Calendar in Marathi sakal
संस्कृती

July 2025 Calendar: गुरुपौर्णिमा, नागपंचमी ते कारगिल विजय दिवस; जाणून घ्या जुलै महिन्यातील महत्त्वाचे सण आणि उत्सव

July Festivals in India 2025: गुरुपौर्णिमा, नागपंचमी, आषाढी एकादशीपासून कारगिल विजय दिनापर्यंत जुलै महिन्यात साजरे होणारे सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

Hindu Festivals in July Month: जुलै महिन्याला सुरुवात झाली असून श्रावणाच्या तयारीची हलचाल सर्वत्र जाणवू लागली आहे. पावसाचा जोर वाढत असतानाच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींनी भरलेला हा महिना नागरिकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

यंदा गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपंचमीसारखे पवित्र सण तसेच कारगिल विजय दिवस, लोकमान्य टिळक जयंती यांसारखे ऐतिहासिक दिवस जुलैमध्ये साजरे केले जाणार आहेत. याशिवाय अनेक जागतिक दिन आणि राष्ट्रीय महत्त्वाचे दिवसही या महिन्यात येणार आहेत. तर जाणून घेऊया जुलै महिन्यात कोणते सण, जयंत्या आणि विशेष दिन कोणत्या तारखेला साजरे केले जाणार आहेत.

१ जुलै – महाराष्ट्र कृषी दिन, डॉक्टर्स डे (National Doctor's Day)

२ जुलै – जागतिक क्रिडा पत्रकार दिन (World Sports Journalists Day)

३ जुलै – गुरुदेव रानडे जयंती, राष्ट्रीय चॉकलेट वेफर दिन

४ जुलै – अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन (Independence Day of USA)

५ जुलै – जागतिक सहकार दिन

६ जुलै – पंढरपूर आषाढी एकादशी यात्रा, आंतरराष्ट्रीय किसिंग डे (International Kissing Day)

१० जुलै – गुरुपौर्णिमा, मातृसुरक्षा दिन (Guru Purnima)

११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day)

१३ जुलै – काश्मिर दिन

१४ जुलै – गोपाळ गणेश आगरकर जयंती, फ्रेंच नॅशनल डे (French National Day)

१५ जुलै – जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day)

१७ जुलै – आंतरराष्ट्रीय न्याय दिन (International Justice Day)

१८ जुलै – नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन (Nelson Mandela International Day)

२० जुलै – राष्ट्रीय चंद्र दिन (National Moon Day)

२२ जुलै – संत नामदेव महाराज संजीवनी समाधी दिन

२३ जुलै – लोकमान्य टिळक जयंती

२४ जुलै – आषाढी अमावस्या (गटारी), गुरुपुष्यामृत योग

२५ जुलै – श्रावण मासारंभ, राष्ट्रीय वाईन अँड चीज डे (National Wine & Cheese Day of)

२६ जुलै – कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Divas)

२७ जुलै – हरियाली तीज, राष्ट्रीय पालक दिन (Hariyali Teej, National Parents Day)

२८ जुलै – जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Environment Conservation Day)

२९ जुलै – नागपंचमी, नॅशनल कॅमेरा डे, नॅशनल लिपस्टिक डे, नॅशनल लजानिया डे (Nagpanchami, National Camera Day, National Lasagna Day, National Lipstick Day )

३० जुलै – भगवान कल्की जयंती

३१ जुलै – गोस्वामी तुलसीदास जयंती, छत्रपती राजाराम महाराज जयंती, शहीद उधमसिंह शहिद दिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT