What happens to Jagannath Rath after the Yatra | Jagannath Rath Yatra 2025 Sakal
संस्कृती

Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ पुरी रथ यात्रेनंतर रथाच्या चाकांचा होतो लिलाव! काय आहे किंमत? जाणून घ्या

Jagannath Rath Wheel Sale After Yatra: जगन्नाथ रथ यात्रा झाल्यानंतर रथाचे चाक भक्तांसाठी लिलावात विक्रीस ठेवले जातात, जाणून घ्या त्यामागील प्रक्रिया व किंमत.

Anushka Tapshalkar

Jagannath Puri Rath Yatra Wheel Auction: ओडीसातील सर्वात मोठा आणि असंख्य भाविक ज्याची आतूरतेने वाट पाहतात तो उत्सव म्हणजे जगन्नाथ पुरी रथ यात्रा. ही यात्रा नेहमी जून किंवा जुलै महिन्यात साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी ही यात्रा होते. यंदा ही भव्य रथ यात्रा 27 जून रोजी, म्हणजेच उद्या पार पडणार आहे.

या दिवशी भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना पूर्णपणे नवीन आणि छान सजावट केलेल्या रथातून पुरीच्या मुख्य मंदिरातून गुंडीच्या मंदिराकडे नेले जाते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, दरवर्षी हे नवीन रथ तयार केले जातात ते यात्रा झाल्यावर कुठे जातात? त्यांच्या चाकांचं काय होतं? चला तर मग, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

तीन वेगवेगळे रथ

पुरीतील या यात्रेत भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्यासाठी स्वतंत्र रथ बनवले जातात. तसेच या तिन्ही रथांची उंची, चाके आणि रचना वेगवेगळी असते.

- श्रीजगन्नाथांचा रथ

सर्वात शेवटी निघणारा हा रथ असून, याला १६ चाके असतात. हा रथ 'नंदीघोष' किंवा 'गरुडध्वज' म्हणून ओळखला जातो.

- बलभद्रांचा रथ

यात्रेतील सर्वात पुढे असेलेला जगन्नाथांचे भाऊ बलभद्र यांचा रथ 'तालध्वज' नावाने प्रसिद्ध आहे. या रथाला १४ चाके असतात.

- सुभद्राचा रथ

तर बहीण सुभद्रा यांचा रथ मध्यामध्ये असतो आणि 'दर्पदलन' किंवा 'पद्मरथ' म्हणून ओळखला जातो. या रथाला एकूण १२ चाके असतात.

म्हणजेच एकूण ४२ चाके तयार केली जातात, जी अत्यंत मजबूत लाकडापासून बनवली जातात.

रथयात्रेनंतर रथाचे काय होते?

(Jagannath Puri Traditions After Rath Yatra)

प्रत्येक वर्षी नवीन रथ तयार केला जातो. म्हणून यात्रा पूर्ण झाल्यावर या रथांचा पुन्हा वापर होत नाही. यात्रा संपल्यानंतर काही रथांचे भाग, विशेषतः चाके, भक्तांसाठी लिलावामध्ये (नीलामी) विक्रीसाठी ठेवले जातात. ही नीलामी श्रीजगन्नाथ मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाते.

रथाचे चाक अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याची सुरुवातीची किंमत साधारणतः ₹५०,००० पासून सुरू होते. भक्तांना अर्ज करून चाक किंवा इतर भाग मिळवता येतात. या पवित्र वस्तूंचा गैरवापर होऊ नये याची मंदिर प्रशासन संपूर्ण काळजी घेते.

याव्यतिरिक्त नीलामीनंतर उरलेल्या लाकडांचा उपयोग मंदिरातच केला जातो. काही वेळा ही लाकडे प्रसाद स्वरूपात भक्तांना देण्यात येतात. उरलेल्या लाकडांचा उपयोग मंदिराच्या महाप्रसादाची तयारी करताना केला जातो. देवासाठी बनणाऱ्या नैवेद्याच्या जेवणातही या लाकडांचा वापर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT