Jagannath Rath Yatra 2024 esakal
संस्कृती

Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेचा आजचा दुसरा दिवस, जाणून घ्या मंदिराशी निगडीत 'ही' रहस्ये

Jagannath Rath Yatra 2024 : ओडिशा राज्यातील पुरी शहरात भगवान जगन्नाथांचे भव्य मंदिर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Jagannath Rath Yatra 2024 : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली ओडिशा राज्यातील भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा ७ जुलैपासून सुरू झाली आहे. आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला ही रथयात्रा सुरू होते. ओडिशा राज्यातील पुरी शहरात भगवान जगन्नाथांचे भव्य मंदिर आहे.

भारतातील प्रमुख चार धामांपैकी हे एक प्रमुख धाम मानले जाते. पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून सुरू होणारी ही रथयात्रा १० दिवस चालते. आषाढ शुक्ल पक्षाच्या ११ व्या दिवशी भगवान जगन्नाथांची ही रथयात्रा माघारी फिरते, तेव्हा ही यात्रा संपन्न होते.

या रथयात्रेत जगभरातील भाविक सहभागी होतात. या जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्ण, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत. या तिघांची मूर्ती रथामध्ये ठेवून ही भव्य रथयात्रा दरवर्षी काढली जाते. या जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही रहस्ये आहेत. ती रहस्ये कोणती? चला तर मग जाणून घेऊयात.

१२ वर्षांतून एकदा मूर्ती बदलल्या जातात

भगवान जगन्नाथ मंदिरातील तिन्ही मूर्ती या १२ वर्षांतून एकदा बदलल्या जातात. त्यानंतर, तिथे नवीन लाकडी मूर्तींची स्थापना केली जाते. विशेष म्हणजे या देवाच्या मूर्ती बदलताना संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते. या दरम्यान मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षकांचा ताफा तैनात केला जातो. तसेच, या स्थितीमध्ये मंदिरात केवळ पुजारीच प्रवेश करू शकतात, इतर कुणीही नाही.

श्रीकृष्णाचे हृदय

या मंदिराशी निगडीत असलेले आणखी एक प्रमुख रहस्य म्हणजे श्रीकृष्णाचे हृदय होय. असे मानले जाते की, जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचे प्राण सोडले. त्यानंतर, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा त्यांचे पूर्ण शरीर पंचतत्वांमध्ये विलीन झाले.

परंतु, त्यांच्या शरीराचा एक भाग तसाच राहिला. हा एक भाग म्हणजे श्रीकृष्ण यांचे हृदय होय. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण यांचे हृदय जिवंत माणसासारखे धडधडत होते. हे हृदय अजूनही सुरक्षित असून, ते भगवान जगन्नाथांच्या लाकडी मूर्तीच्या आतमध्ये आहे, अशी धार्मिक मान्यता आहे.

ध्वजाचे रहस्य

भगवान जगन्नाथ मंदिराच्या वरती कळसावर एक ध्वज आहे. हा ध्वज दररोज संध्याकाळी बदलावा लागतो. हा ध्वज जर रोज संध्याकाळी बदलण्यात आला नाही तर हे मंदिर १८ वर्षांसाठी बंद होईल, अशी तिथल्या लोकांची धारणा आहे. त्यामुळे, ऊन, पाऊस आणि वारा काही असुद्या, येथील मंदिराचा ध्वज रोज न चुकता संध्याकाळी बदलला जातो.

मंदिराची सावली

भगवान जगन्नाथ मंदिराचे आणखी एक रहस्य म्हणजे या मंदिराची सावली कधीच उमटत नाही. किती ही मोठा सूर्यप्रकाश असला तरी, या मंदिरात सावली कधीच निर्माण होत नाही.

मंदिरातील स्वयंपाकघराचे रहस्य

जगन्नाथ पुरी मंदिरात जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे. या स्वयंपाकघराचे देखील एक रहस्य आहे. असे म्हटले जाते की, या मंदिरात देवाचा प्रसाद शिजवण्यासाठी मातीची सात भांडी वापरली जातात. ही सात भांडी एकावर एक ठेवून चुलीवर शिजवली जातात.

परंतु, आश्चर्याची बाब ही आहे की, यावेळी सर्वात वर ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो. त्यानंतर, मग खाली ठेवलेल्या भांड्यांमधील प्रसाद एक एक करून शिजला जातो. या प्रसादाबद्दल असे म्हटले जाते की, किती ही मोठ्या संख्येने भक्त आले तरी, येथील प्रसाद कधीच संपत नाही. परंतु, मंदिर बंद झाले की, हा प्रसाद ही संपतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन सिंदूर'मुळे आता पाकिस्तानमध्ये महिलांना मिळणार दहशतवादाचं ट्रेनिंग; 'जैश-ए-मोहम्मद'ने केली घोषणा

IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

थिएटरमध्ये थंड प्रतिसाद पण ॲमेझॉन प्राईमवर Trend होतोय उमेश-प्रियाचा सिनेमा ! टीमने व्यक्त केला आनंद

Ravina Gaikwad : उत्कृष्ट कामगिरी! शेतमजुराच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डंका; वणीच्या रवीना गायकवाडने पटकावले १० हजार मीटरमध्ये रौप्यपदक

Mumbai News: वातावरण बदलाचा फटका! व्हायरल फीवरने मुंबईकर त्रस्त, रुग्णालयात रुग्णांच्या लांबलचक रांगा

SCROLL FOR NEXT