Kaal Sarp Dosh esakal
संस्कृती

Kaal Sarp Dosh : जन्म पत्रिकेत कालसर्प दोष आहे? यामंदिरात दर्शन घेतल्याने होतो फायदा

Nag Mandir : कालसर्प दोष असल्यास नाग मंदिरात दर्शन घेणे लाभदायक समजले जाते.

धनश्री भावसार-बगाडे

Kaal Sarp Dosh Upay In Marathi : काहींच्या जन्म पत्रिकेत कालसर्प दोष असतो. यामुळे त्यांना स्वप्नात साप दिसणे, भीती वाटणे, कामात अडथळा येणे असे अनेक विघ्न अनुभवयाला मिळतात. या दोषाचे निवारण करण्यासाठी काही पूजा विधी केले जातात. पण यासाठी भरपूर वेळ आणि खर्च लागतो. पण यातून सहज सुटका मिळवण्यासाठी फक्त एका मंदिरात दर्शन घ्या. हे मंदिर कोणतं, कुठे आणि दर्शनाने दोष कसे निवारण होतात, जाणून घेऊया.

मंदिर कुठे आहे?

काल सर्प दोषापासून सुटका मिळावी म्हणून उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये असलेल्या दारागंज परिसराच्या उत्तर भागातील नागराज वासुकी मंदिरात जावे. या मंदिरात नागराज वासुकीच देवता स्वरुपात आहेत. त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक लांबून येतात.

मंदिराची लोकप्रियता

अनोख्या वास्तुकलेसाठी नागराज वासुकी यांचे हे मंदिर जगात लोकप्रिय आहे. त्यातही हे एकमेव मंदिर आहे जे नागराज वासुकी यांच्यासाठी बनवण्यात आले आहे. मंदिराच्या एका दरवाजाच्या उंबरठ्यावर शंख वाजवणारे दोन किचक आहेत. त्यात लक्ष्मीचे प्रतीक असलेले कमळ दोन हत्तींनी बनवले आहे. तेथील वास्तूकला सगळ्यांचे लक्ष वेधणारी आहे. नागराज वासुकी देवता फार रेखिव आणि सुंदर आहे. नागराज वासुकींचे हे एकमेव मंदिर आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्व विशेष आहे.

दोषांपासून नाही तर रोगांपासूनही मिळते सुटका

या मंदिराविषयी अशी मान्यता आहे की, एका मराठा राजाला कुष्ठरोग झाला होता. त्याने नागराज वासुकी मंदिरात नवस मागितला की, त्याचा कुष्ठरोग बरा झाला तर मंदिराचा जीर्णोद्धार करेल. त्याची त्या आजारातून सुटका झाली. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करून बाहेर घाटही त्यांनी बनवला.

कशी करावी पूजा?

या मंदिरात पूजेसाठी भाविकांनाच आवश्यक ते सामान घेऊन जावे लागते. कालसर्प दोष निवारणासाठी प्रथम प्रयाग संगमावर स्नान करावे. त्यानंतर वाटाणे, हरभरा, फुले, हार आणि दूध घेऊन नाग वासुकी मंदिरात जावे. यानंतर वासुकी नागाचे दर्शन घेतल्यावर त्यांना पूजा साहित्य अर्पण करावे आणि दोष निवारणासाठी प्रार्थना करावी.

या मंत्राचा जप करावा

नाग गायत्री मंत्र: 'ॐ नवकुलाय विद्यमहे विषदंताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्। हा मंत्र कालसर्प दोष निवारणासाठी प्रभावी मानला जातो.

या शिवाय 'ॐ नमः शिवाय' आणि 'ॐ नागदेवताय नम:' या मंत्रांचा जप करू शकता. रुद्राक्ष माळेच्या मदतीनं 108 वेळा जप करा. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT