Kalikadevi nashik esakal
संस्कृती

राज्यातील एकमेव बैठक अवस्थेतील नाशिकमधील 'कालिकादेवी'

युनूस शेख :सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : राज्यात कुठे नाही. अशी बैठक अवस्थेतील कालिका मातेचे मंदिर जुने नाशिक भागातील जुनी तांबटलेने येथे आहे. सुमारे ६०० वर्षापूर्वी कंसारा समाजातील बांधवांकडून मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत याबांधवांकडून कुठलाही खंड न पडता पारंपारीक पद्धतीने पिढ्यांपिढ्या देवीची महाआरती तसेच नवरात्रोत्सव साजरा केला जात आहेे. कोरोना (Corona) प्रादुर्भावमुळे दोन वर्षापासून गरबा-दांडीयाचे आयोजन करण्यात आले नाही मात्र धार्मिक पुजा- विधी नित्यनियमाने होत आहेत.

...अशाप्रकारे या देवीची स्थापना नाशिकमध्ये झाली

कालिका देवी कंसारा समाजाचे परम दैवत आहे. तांबे पितळाचे भांडे घडविण्याचे त्यांचे काम. त्यांची कला सर्वदूर पोहचावी तसेच रोजगार उपलब्ध होण्याच्या हेतूने गुजरातमधील चंपानेर येथील कंसारा समाजातील कारागीर तेथून बाहेर पडले. राज्याच्या विविध भागात वस्ती करुन राहू लागले. त्यातीलच काही बांधव सुमारे ६०० वर्षापूर्वी शहरात आले. येताना त्यांनी त्यांचे परम दैवत कालिका देवीची मुर्ती देखील आणली. त्यावेळी जुन्या तांबट आळीत त्यांनी देवीचे लहानसे मंदिर बांधले. तांबे, पितळेची भांडी घडविण्याच्या व्यवसायास जोड म्हणून त्यानी मधल्या काळात भाले, तलवार आदी हत्यारे घडवण्याचे काम केले. १८५७ साली कंसारा समाज संस्थेची स्थापना झाली.

देवीचे प्रमुख वैशिष्टे...

कालिकादेवीची राज्यातील एकमेव अशी काळ्या पाषाणात साकारलेली बैठक अवस्थेतील मूर्ती आहे. चार हातांच्या देवी मूर्तीच्या एका हातात धुपपात्र, अन्य तिन्ही हातात तलवार, त्रिशुळ, डमरू आहे. देवीच्या चेहऱ्यावर हास्य, शांत भाव आहेत. सुमारे ६०० वर्षांपूर्वीची मूर्ती असून देवीच्या अभिषेकासाठी पाणी आणि एका विशिष्ट प्रकारचे आयुर्वेदिक उटण्याचा वापर केला जातो. कुठलाही वज्रलेप न करता देवीची मुर्ती अजूनही सुस्थितीत आहे.


जुन्या तांबट आळीमध्ये असलेल्या मंदिराच्या जागी नवीन लाकडी बांधणीची इमारत उभी केली. त्यात विधीव्रत कालिका देवीची स्थापना करण्यात आली. कामानिमित्ताने समाज बांधव देशात कुठेही असोत नवरात्रीमध्ये मंदिरातील पारंपारिक धार्मिक विधीत सहभागी होवून दर्शन घेतात. गरबा खेळण्याचा आनंद घेतात. याठिकाणी दशमीला होम हवन केले जाते. अष्टमीला सर्वांचा उपवास असल्याने उकडलेल्या शेंगदाण्याचा प्रसाद वाटप केला जातो. इतर दिवस केवळ उकडलेल्या हरभऱ्यांचा प्रसाद असतो. श्रावण आणि चैत्र महिन्यांतील अमावस्येलाही महाआरती होत असल्याची माहिती विश्‍वस्तांनी दिली.

''देवीच्या आरतीसाठी कणकेपासून बनविलेल्या दिव्याचे महत्व आहे. देवीची आरती याच माध्यमातून होत असते. अष्टमीला घरोघरी त्याची पुजा होते. मंदिराचे विश्‍वस्त सभासदांकडून दिव्याची बोली लावली जाते. जो अधिक बोली बोलतो. तो दिवा त्यांच्याकडे दिला जातो. विधीव्रत पुजेनंतर दशमीला त्या दिव्यापासून बनविलेल्या लाडूचा प्रसाद भाविकांमध्ये वाटप केला जातो. दिवा घरात येणे म्हणजे देवीची कृपा समजली जाते.'' - विनोद कंसारा, उपाध्यक्ष कालिका मंदिर संस्थान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT