थोडक्यात:
20 जुलै 2025 रोजी केतूचा गोचर शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होणार असून तो 25 जानेवारी 2026 पर्यंत चालेल.
केतू-शुक्र मैत्रीमुळे वृषभ, मिथुन, कुंभ, आणि वृश्चिक राशींना याचा विशेष लाभ मिळेल.
हा गोचर यश, पैसा, प्रसिद्धी, आरोग्य आणि वैवाहिक संबंधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
Which zodiac signs will benefit from Ketu transit 2025: केतूचा गोचर 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे. हा गोचर शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होत आहे, म्हणून तो खास महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रात केतू आणि शुक्र हे एकमेकांचे मित्र मानले जातात. त्यामुळे या गोचराचा परिणाम काही राशींवर चांगला आणि लाभदायक होईल. केतू 25 जानेवारी 2026 पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. त्यामुळे पुढचे सहा महिने वृषभ, मिथुन, कुंभ आणि वृश्चिक या राशींसाठी फायदेशीर ठरतील. केतू हा अचानक यश, प्रसिद्धी, पैसा आणि आध्यात्मिक प्रगती देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे या गोचरामुळे या चार राशींच्या आयुष्यात चांगले आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
या राशीसाठी केतूचा गोचर त्यांच्या चौथ्या घरात होणार आहे. चतुर्थ भाव हा मातृसौख्य, घर, स्थावर मालमत्ता आणि मानसिक शांतीचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे या राशीच्या जातकांना घरगुती सुखात वाढ होईल. घर खरेदीसाठी हे उत्तम वेळ असू शकतो. आईच्या आरोग्याशी संबंधित त्रास कमी होतील. या काळात अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. नोकरीत बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या सौद्यांचे आणि लाभदायक संधींचे आगमन होईल. पचनाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारीतही या काळात सुधारणा दिसून येईल.
मिथुन राशीसाठी केतूचा गोचर तिसऱ्या घरात होणार आहे. तृतीय भाव हा धैर्य, पराक्रम, छोट्या प्रवास आणि कलेचा भाव मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांमध्ये आत्मविश्वास आणि साहस वाढेल. त्यांना धन कमावण्याचे नवे मार्ग मिळतील. काही जणांना अचानकपणे आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा अध्यात्मिक कल वाढेल, आणि काही जण तीर्थयात्रांवरही जाऊ शकतात. प्रेमसंबंधातही स्पष्टता येईल. जे लोक दीर्घकाळापासून सांधेदुखी किंवा पायांच्या त्रासाने त्रस्त होते, त्यांना या काळात आराम मिळू शकतो.
या राशीच्या जातकांसाठी केतू सातव्या घरात गोचर करणार आहे. सप्तम भाव हा वैवाहिक संबंध, भागीदारी आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असतो. त्यामुळे या राशीतील विवाहित व्यक्तींच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. व्यवसायात भागीदारांशी संबंध अधिक मजबूत होतील. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. समाजात तुमचा आदर वाढेल आणि तुमचं नाव ओळख मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा असेल. तुमच्या कल्पनाशक्तीला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामात समाधानी राहाल.
वृश्चिक राशीसाठीही केतू सातव्या घरात गोचर करणार आहे. विशेषतः वैवाहिक जीवनात याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल. पूर्वी जर जोडीदारासोबत तणाव असेल, तर आता त्यात सुधारणा होईल. नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल. करिअरमध्येही प्रगतीचे दरवाजे खुलतील. काही जणांना नवीन नोकरी किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारांशी विश्वासाचं नातं अधिक बळकट होईल. समाजात तुमचं स्थान आणि मान-सन्मान वाढेल.
केतूचा गोचर कधी आणि कुठे होत आहे?
20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:12 वाजता केतू शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार असून तो 25 जानेवारी 2026 पर्यंत तिथे राहील.
केतू-शुक्र मैत्रीचा राशींवर कसा परिणाम होतो?
केतू आणि शुक्र मित्र ग्रह असल्यामुळे गोचराचा परिणाम सौंदर्य, कला, प्रसिद्धी, अध्यात्म आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक राहतो.
या गोचराचा वृषभ आणि मिथुन राशींवर कसा प्रभाव पडेल?
वृषभ राशीतील लोकांना घरगुती सुख, धनलाभ व नोकरीत प्रगती मिळेल, तर मिथुन राशीतील लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक संधी उपलब्ध होतील.
केतूचा गोचर वैवाहिक नात्यांवर काय परिणाम करेल?
कुंभ व वृश्चिक राशींसाठी सप्तम भावातील केतूचा गोचर वैवाहिक जीवनात सुधारणा, समजूतदारपणा आणि प्रेम वाढवणारा ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.