Bhagwat Ekadashi  esakal
संस्कृती

Bhagwat Ekadashi : भागवत एकादशीला करा अशी पूजा; या व्रताने मिळतं...

'एकादशी' ही विष्णूंची तिथी असून या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात.

सकाळ डिजिटल टीम

Bhagwat Ekadashi : हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. 'एकादशी' ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात.

एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. यावेळी तुम्ही कॅलेंडरमध्ये ‘स्मार्त' आणि 'भागवत', अशा दोन एकादशी बघितल्या असतील. यावेळी १६ फेब्रुवारीला स्मार्त तर १७ फेब्रुवारीला भागवत एकादशी आहे. 

भागवत एकादशी पूजाविधी 

या महिन्यामध्ये माघ कृष्ण पक्षात स्मार्त एकादशी १६ फेब्रुवारीला आणि भागवत एकादशी १७ फेब्रुवारीला असणार आहे. यामुळे द्वादशी १८ फेब्रुवारीला आणि १९ फेब्रुवारीला त्रयोदशी आहे. वारकरी सांप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते.

या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते.

एकादशीचे महत्त्व

एकादशीचे व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.

दरम्यान, कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्‌तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. यादिवशी विष्णुंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Airstrike Iran : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला धुडकावून इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला

Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

SCROLL FOR NEXT