कथा मार्कण्डेय मंदिराची Esakal
संस्कृती

Shravan Special जेव्हा महादेवाने यमाला केलं होतं बंदिस्त, मार्कण्डेय महादेव मंदिराची कथा

महादेवाने तर एका भक्ताचं रक्षण करण्यासाठी चक्क मृत्यूची देवता यमाला देखील बंदी बनवलं होतं. होय ही कथा पुराणांमध्ये आढळते. याच कथेविषयी आणि मार्कण्डेय मंदिराविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

Kirti Wadkar

श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. यंदाचा श्रावण मास Shravan हा दोन महिन्यांचा असणार आहे. श्रावणमास हा भगवान शंकरासाठी समर्पिक आहे. या काळामध्ये महादेवाची Lord Mahadev मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. महादेवाला प्रिय असलेल्या या श्रावणमासात त्यांची श्रद्धेने पूजा करणाऱ्याची भगवान शंकर इच्छा पूर्ण करतात अशी भक्तींची श्रद्धा आहे. Know the Story of Markandeya Mahadev Mandir Shravan Special

महादेव हे त्यांच्या चरणी लीन झालेल्या भक्ताला कधीच रिकाम्या हाती पाठवत नाहीत. मग ती व्यक्ती कुणीही असो. म्हणूनच महादेवाला भोलेलाथ असंही म्हंटलं जातं. महादेवाच्या Bhagwan Mahadev कृपादृष्टीच्या आजवर तुम्ही अनेक पौराणिक कथा ऐकल्या असतील. यामध्ये त्यांनी भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी दाखवलेलं वात्सल्य दिसून येतं.

महादेवाने तर एका भक्ताचं रक्षण करण्यासाठी चक्क मृत्यूची देवता यमाला देखील बंदी बनवलं होतं. होय ही कथा पुराणांमध्ये आढळते. याच कथेविषयी आणि मार्कण्डेय मंदिराविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मार्कण्डेय महादेव मंदिराची कथा

उज्जैनमधील एका मंदिरामध्ये भगवान शंकराने आपल्या भक्ताच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी यमाला साखळदंडाने बांधून ठेवल्याची पुराणामध्ये कथा आहे. या महादेवाला मार्कण्डेय महादेव असंही म्हणतात.

वाराणशीपासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर गंगा गोमतीच्या संगमावर वसलेल्या कैथी गावामध्ये हे मार्कण्डेय महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर ५००० वर्ष पुरातन आहे.

पुराणातील कथेनुसार ऋषी मृकंड आणि त्यांची पत्नी अरुंधती यांनी संतना नसल्याने ते कायम पूत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करत एकेदिवशी ब्रह्म देवांनी त्यांना सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ऋषी मृकंड पत्नीसह गंगा-गोमती काठावर वसलेल्या कैथी गावी आले आणि त्यांनी महादेवाची उपासना सुरू केली.

हे देखिल वाचा-

अनेक वर्षांनंतर महादेव मृकंड ऋषींच्या उपासनेने प्रसन्न होवून भगवान शंकर प्रकट झाले. यावेळी महादेव मृकंड ऋषिंना म्हणाले, तुमच्या भाग्यात संतानप्रात्पी नाही. मात्र तरीही मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न होवून तुमची इच्छा पूर्ण करत आहे. यावेळी महादेवाने मात्र त्यांना दोन पर्यायांपैकी एकाची निवड करण्यास सांगितली.

महादेवाने मृकंड ऋषिंना तुम्हाला जास्त आयुष्य असलेला अवगुणी पूत्र हवाय की गुणवान मात्र कमी आयुष्य असलेला पूत्र हवाय असे दोन पर्याय देऊन एक निवडण्यास सांगितलं. यावर मृकंड ऋषिंनी गुणवान मात्र कमी आयुष्य असलेल्या पुत्राची निवड केली.

महादेवाच्या आशिर्वादाने मृकंड ऋषिंच्या पत्नी अरुंधती यांना पूत्र प्राप्ती झाली. त्याचं नाव त्यांने मार्कण्डेय ठेवलं. पूत्राचं आयुष्य कमी असेल विचाराने मात्र ऋषिमुनी कायम चिंतेत असतं. मार्कण्डेय अत्यंत गुणवान होता. तो देखील महादेवाचा परम भक्त होता. महादेवाची भक्ती करण्यात तो दिवसरात्र रमत असे

मार्कण्डेयने अनेकदा आपल्या आई-वडिलांना चिंतेत पाहिलं होतं. एकदा हट्ट करून त्याने आई-वडिलांना चिंतेचं कारण विचारलं. तेव्हा मृकंड ऋषिंनी त्याला त्याच्या जन्माची कहाणी सांगितली. अल्प आयुष्याबद्दल कळताच मार्कण्डेयने महादेवाची दीर्घायुष्य लाभण्यासाठी अधिक उपासना सुरू केली. अनेक तास तर कधी दिवसभर तो समाधी लावून बसे.

महादेवाच्या क्रोधापुढे यमाची हार

मार्कण्डेय १२ वर्षांचा असताना त्याला नेण्यासाठी यमदूत आले. मात्र मार्कण्डेयने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर स्वत: यम मार्कण्डेयाचे प्राण घेण्यासाठी अवतरला. यावेळी मार्कण्डेय शिवलिंगा समोर बसून महादेवाचं स्मरण करण्यात लीन होता.

यमाला पाहताच मार्कण्डेयने शिवलिंगाला कवटाळून धरलं. याचवेळी यमाने मृत्यूचा फास फेकला जो थेट शिवलिंगाभोवती अडकला. यावर महादेव क्रोधीत होवून मार्कण्डेयचे प्राण वाचवण्यासाठी प्रकट झाले. त्यांनी यमाशी युद्ध केलं आणि त्याला साखळ दंडाने बंदीस्त केलं.

महादेवाने मार्कण्डेयाला अमरत्वाचं वरदान दिलं. तसचं यमाला तो मार्कण्डेयचे प्राण कधीच घेणार नाही तो अमर राहिल या अटीवर सोडून दिलं.

ज्या ठिकाणी मार्कण्डेय उपासनेस बसले होते त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरात शिवलिंगाचं मुख उत्तर दिशेला आहे. यमाची दिशा ही उत्तर दिशा असल्याने महादेव त्या दिशेकडे पाहत आपल्या भक्तांचं रक्षण करत आहेत असं मानलं जातं.

दीर्घायुष्यासाठी भक्तांची गर्दी

संपूर्ण वर्षभर अनेक शिवभक्त या मंदिराला भेट देऊन मार्कण्डेय महादेवाचे आशिर्वाद घेत असता. दीर्घायुष्य लाभण्यासाठी तसंच पूत्र प्राप्ती आणि सुखी संसारासाठी महादेवाची कृपादृष्टी रहावी म्हणून भक्त इथं महादेवाची पूजा अभिषेक करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT