Krishna janmashtami 2022 Esakal
संस्कृती

Krishna janmashtami 2022: यंदा कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी?

यंदा रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होणार आहे.आणि शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल.

यंदाचा जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे ?

जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी 12:05 ते 12:56 पर्यंत अभिजीत मुहूर्त राहील. दुसरीकडे, ध्रुव योग 18 ऑगस्ट रोजी रात्री 08:41 ते 19 ऑगस्ट रोजी रात्री 08:59 पर्यंत असेल. तर 17 ऑगस्ट रोजी रात्री 08:56 ते 18 ऑगस्ट रात्री 08:41 पर्यंत वृद्धी योग आहे. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तर महाराष्ट्र दहीहंडी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते.

जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाची पुजा कशी करावी ?

सर्वप्रथम जन्माष्टमीला श्रीकृष्णाला शृंगार केल्यानंतर अष्टगंध चंदन, अक्षत आणि रोळीचा तिलक लावावा. माखन असलेले नैवेद्याचे पदार्थ श्रीकृष्णाला अर्पण करावे. कृष्णाला वैजयंतीची फुले अर्पण करावे..श्रीकृष्णाच्या विशेष मंत्रांचा जप करा. विसर्जनासाठी अक्षदा हातात घेऊन मूर्तीवर अर्पण करावे आणि म्हणावे हे भगवान श्रीकृष्ण , आम्हा सर्वांवर तुझा कृपा आशिर्वाद राहू दे !

जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाला प्रसाद कोणता असतो ?

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या नैवेद्यात पंचामृत अर्पण करा. त्यात तुळशीची पाने घाला. पुरणाचा नैवैद्य या पूजेला करू शकता. काही ठिकाणी श्रीखंड पुरीचा नैवैद्यही दाखविला जातो. या दिवशी श्रीकृष्णाला सर्व प्रकारचे पदार्थ असलेले संपूर्ण सात्विक अन्न अर्पण केले जाते.
विशेष सुचना - ही पूजा करतांना काळा किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT