Magh Amavasya esakal
संस्कृती

Somvati Amavasya 2023 : आज चुकूनही करु नका 'ही' कामे अन्यथा पितरांचा होईल अनादर

या दिवशी पूर्वज प्रसन्न होतात आणि वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो

सकाळ ऑनलाईन टीम

Magh Amavasya : हिंदू पंचांगनुसार आज अमावस्या आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे हिला सोमवती अमावस्या असंही म्हणतात. याला माघ अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की आजच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं. आजची अमावस्या ही खास आहे. आज पितरांची पूजा केली जाते. असं मानलं जातं की. या दिवशी पूर्वज प्रसन्न होतात आणि वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा आजच्या दिवशी आवर्जून काही चुका टाळा.

ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वजांच्या आशीर्वादाने व्यक्तीसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. कुटुंबात सुख-शांती नांदते. पूर्वजांना राग आला तर वंशजांना कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं असं म्हणतात. घरात कलह निर्माण होऊन व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही काही कामं करु नयेत असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

माघ अमावस्येला या गोष्टी चुकूनही करु नका

- सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण अवश्य करा. या दिवशी चुकूनही पितरांचा अनादर करू नका

- गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना अन्न खायला द्या. हे अन्न पितरांना मिळतं असं म्हणतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी चुकूनही या जीवांना त्रास देऊ नका. तुम्ही घरी जे काही अन्न शिजवाल, त्यातील काही भाग या प्राण्यांनाही द्या. (Astrology)

-  अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांच्या मार्फत तर्पण, पिंडदान, श्राद्ध इत्यादींची प्रतीक्षा करतात. ते मिळाले नाही तर ते त्यांच्या वंशजांवर रागावतात. दुःखी होऊन वंशजांना शाप देतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

- ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य आणि इतर उपद्रवी पदार्थांचं सेवन करू नये. असे केल्याने नकारात्मकता वाढते. एवढंच नाही तर ते तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात. (Sanskruti)

-  यासोबतच अमावस्या तिथीला ब्रह्मचर्य नियमांचं उल्लंघन करू नये. यासोबतच अमावस्येच्या पूजेच्या वेळी पितृसूक्त किंवा पितृ स्तोत्राचे पठण केल्यास शुभ फळ मिळतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT