

Thane Shiv Sena UBT Leader Pradeep Purnekar Murder Case
esakal
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाण्यातील मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र जोपर्यंत सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पूर्णेकर कुटुंबीयांना सांगितले, दरम्यान प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने आपण आधीच वडिलांना सावध केल्याचे आणि काही तरी घडणार असल्याचे संशय होता असे माध्यमांशी बोलताना सांगितले.