Somvati Amavasya 2023 esakal
संस्कृती

Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येला करा 'हे' 5 महादान, क्रोधित पितरही होतील प्रसन्न

क्रोधित पितरांना प्रसन्न करण्यासाठी हे ५ महादान करा

सकाळ ऑनलाईन टीम

Somvati Amavasya 2023 : शास्त्रानुसार सोमवती अमावस्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. हिंदू धर्मात शुभ तिथींना स्नान आणि दान करण्याचे खूप महत्व आहे. तसेच आजपासून पंचक लागणार असल्याने या स्नानाला विशेष महत्व आहे. शिवाय आज सोमवती अमावस्येला पितरांना दान केल्या जातं. तेव्हा क्रोधित पितरांना प्रसन्न करण्यासाठी हे ५ महादान करा.

सोमवती अमावस्येला पूर्वजांसाठी करा हे दान

गरजू व्यक्तींना या दिवशी कपड्यांचे दान करा. ज्याप्रमाणे आपल्या थंडी, ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांना देखील असेल असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तेव्हा तुमच्या पूर्वजांना वस्त्र दान करा.शास्त्रानुसार धोतर आणि टॉवेल हे श्रेष्ठ दान मानल्या जातं.

चांदीच्या वस्तू

पौराणिक मान्यतेनुसार पितरांचं स्थान चंद्राच्या वरच्या भागात असतं, यामुळे तुम्ही चांदीपासून बनवलेल्या वस्तू पूर्वजांना दान करू शकता. यामुळे त्यांना आनंद होतो. सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतो.

दूध आणि तांदूळ दान

पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दूध आणि तांदूळ यांसारख्या चंद्राशी संबंधित वस्तूही दान करू शकता. या दानाने संतप्त पितरही प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद मिळतात. 

काळ्या तिळाचं दान 

अमावस्येच्या दिवशी स्नान करून ध्यान करून आपल्या पितरांना काळ्या तिळाचं दान करा. इतर जे काही दान करणार असाल त्यासोबत हातात तीळ घेऊन दान करा. धार्मिक मान्यतेनुसार त्या वस्तू पितरांकडून प्राप्त होतात. ते त्यांच्या वंशावर आनंदी राहतात. (Sanskruti)

जमीन दान

जर तुम्ही सक्षम आणि धनवान असाल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या किंवा पितृ पक्षाच्या दिवशी जमीन दान करू शकता. जमीन दान (Donation) हे महान दान मानलं जातं. मोठ्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी जमीन दान केली जाते. 

पिंड दान

ज्यांनी आपल्या पूर्वजांसाठी पिंड दान केलं नाही ते सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करून पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतात. हिंदू धर्मात पिंड दानाला खूप महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT