Mahashivratri 2023 esakal
संस्कृती

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला बेलपत्र वाहण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी

महाशिवरात्रीला बेलपत्र वाहण्यासाठी आधी ते तोडावे लागतात. पण त्यावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mahashivratri Belpatra : महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा, अर्चा केली जाते. शंकराच्या पिंडीवर मनोभावे अभिषेक करून बेलपत्र वाहिले जातात. शंकराला बेलपत्र फार प्रिय असतात असं मानलं जातं. त्यांमुळे या दिवशी बेलपत्रांना विशेष महत्व असतं. पण त्यासाठी ही पानं बेलाच्या झाडावरुन तोडताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा विपरित परिणामांनाही सामोरं जावं लागतं.

बेलपत्राशिवाय शंकराची पूजा अर्धवट राहते. त्यामुळे शास्त्रात या बेलपत्राच्या तोडण्याविषयी काही नियम सांगण्यात आले आहेत. यात कोणत्या दिवशी बेलपत्र तोडू नये, तोडताना काय काळजी घ्यावी, तोडण्यापूर्वी काय करावे आणि कसे अर्पण करावे? या विषयीची नियमावली शास्त्रात देण्यात आली आहे. जाणून घेऊया.

या दिवशी बेलपत्र तोडू नये

शास्त्रानुसार बेलपत्र कधीही चतुर्थी, अष्टमी, नवमी, प्रदोष व्रत, शिवरात्री आणि सोमवारी तोडू नये. असे केल्याने तुम्ही पापाचे धनी होतात.

तोडताना काय काळजी घ्यावी?

बऱ्याचदा पिंडीवर ११, ५१, १०८ किंवा त्यापेक्षा जास्त बेलपत्रांचा अभिषेक केला जातो. त्यामुळे भरपूर पाने हवी असतात. पण शास्त्र सांगतं की, त्यासाठी कधीही संपूर्ण फांदी तोडू नये. एक एक पानच कायम तोडून गोळा करावे.

तोडण्यापुर्वी काय काळजी घ्यावी?

बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र समजले जाते. त्यात शिवपार्वतीचा वास आहे असं मानलं जातं. त्यामुळेच या झाडाची पानं शंकराच्या पिंडीवर वाहिली जातात. शिवाय या झाडाचं आयुर्वेदातही फार महत्व आहे. त्यामुळे झाडाची पानं तोडण्यापुर्वी भगवान शंकर, पार्वती मातेला मनोभावे नमस्कार करावा, मग बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मग पानं तोडावी.

बेलपत्र वाहण्यापूर्वी ही काळजी घ्यावी

बेलपत्र तोडल्यानंतर ती तशीच पिंडीवर वाहू नये. बेलाच्या झाडाला काटे असतात. पानं वाहताना हे काटे काढून घ्यावेत. कोमेजलेलं पान वाहू नये. पानं स्वच्छ धुवून मगच अर्पण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीमुळे सोनं स्वस्त! महिन्यात 13 हजारांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

IPL 2026: आवेश खानच्या अतिउत्साहाने फिरवलं असतं रिषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; पण SRH च्या चूक लक्षातच आली नाही अन्...

Google Vids Free AI Video Maker : फ्रीमध्ये बनवा व्हिडिओ अन् कमवा लाखो रुपये; गुगलने लाँच केलं Vids फीचर, कसं वापरायचं? पाहा

Latest Marathi News Live Update : आसाम विधानसभा निवडणुकीत एनडीएला ९५ जागा मिळतील, भाजप उमेदवाराचा दावा

Kolhapur Schools Action : वेतन अनुदानासाठी 85 शाळा कायमस्वरूपी अपात्र; राज्य शासनाचा दणका; 'या' 48 तुकड्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT