

Avesh Khan’s Interference Could Have Cost LSG 5 Runs
Sakal
SRH vs LSG Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रविवारी (५ एप्रिल) रोमांचक विजय मिळवला. राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौने शेवटच्या षटकात एक चेंडू राखून ५ विकेट्सने विजय मिळवत गुणांचं खातं उघडलं.
या सामन्यात कर्णधार रिषभ पंतची (Rishabh Pant) खेळी लखनौसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. मात्र सामन्याच्या शेवटी आवेश खानकडून (Avesh Khan) झालेल्या एका चुकीमुळे पंतच्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकलं असतं.