Black Sesame Significance and Remedy Esakal
संस्कृती

Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांत स्पेशल काळ्या तिळाच महत्त्व आणि उपाय...

हातात मूठभर काळे तीळ घेऊन घराबाहेर पडा. वाटेत जिथे कुत्रा दिसला तिथे त्या कुत्र्यासमोर तीळ ठेवून पुढे जा. जर तो कुत्रा काळे तीळ खाताना दिसला तर समजावे की काम कितीही कठीण असले तरी त्यात यश मिळेलच

सकाळ डिजिटल टीम

माघ महिन्यात काळे तीळ वापरणे धार्मिक दृष्टीकोनातून खूप शुभ मानले जाते. काळ्या तिळाचे सेवन करणे आणि त्याचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. 

काळ्या तिळाचा उपयोग सर्व धार्मिक कार्य, हवन, पूजा इत्यादींमध्ये केला जातो. काळ्या तीळाचे दान करून काही उपाय केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. आपल्याकडे माघस्नानाला महत्व आहे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की ज्यांनी माघ महिन्यात सकाळी स्नान केले, विविध प्रकारचे दान केले आणि भगवान विष्णूचे स्तोत्र पठण केले, ते ईश्वरी निवासस्थानात आनंदाने राहतात. आजच्या लेखात आपण सविस्तर रित्या जाणून घेऊया काळ्या तिळाचे महत्त्व आणि उपाय काय याची माहिती.

माघ महिना धार्मिक दृष्टीकोनातून अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यात केलेले जप, तप आणि दान हे भाविकांचे दारिद्र्य दूर करण्यासोबतच मोक्ष मिळवण्यास मदत करते, असे मानले जाते. या महिन्यात काळ्या तिळाचे काही उपाय केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ, काळे उडीद दान करा. या उपायाने आर्थिक संबंधित समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून मूठभर काळे तीळ सात वेळा ओवाळून घराच्या उत्तर दिशेला टाका, धनहानी थांबेल.
तुमची वाईट वेळ संपण्याचे नाव घेत नसेल तर ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करा, काळे तीळ दुधात मिसळून दर शनिवारी पिंपळावर अर्पण करा. यामुळे जो काही वाईट काळ चालू आहे तो निघून जाईल
कुंडलीत शनीचे दोष असतील किंवा शनीची साडेसाती किंवा ढैय्या चालू असेल तर माघ महिन्याच्या प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्याच्या नदीत काळे तीळ वाहावेत. या उपायाने शनिदेवाच्या दोषापासून मुक्ती मिळते. 
दर शनिवारी काळ्या तीळाचे दानही करू शकता. यामुळे राहू-केतू आणि शनीचे वाईट प्रभाव संपतात. याशिवाय कालसर्प योग आणि पितृदोष इत्यादींमध्येही हा उपाय प्रभावी आहे.
हातात मूठभर काळे तीळ घेऊन घराबाहेर पडा. वाटेत जिथे कुत्रा दिसला तिथे त्या कुत्र्यासमोर तीळ ठेवून पुढे जा. जर तो कुत्रा काळे तीळ खाताना दिसला तर समजावे की काम कितीही कठीण असले तरी त्यात यश मिळेलच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT