Makar Sankranti 2023 Shubh Muhurat : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी केवळ एक महिणा बाकी आहे. नव्या वर्षात पहिलाच सण मकर संक्रांतीचा असतो. परंतु नेहमी मकर संक्रांतीच्या तिथीबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. धार्मिक मान्यतांनुसार सूर्याच्या राशी बदलाच्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो.यंदाच्या नविन वर्षी म्हणजे 2023 मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात गोंधळ आहे. यावेळी मकर संक्रांती 14 जानेवारी की 15 जानेवारीला साजरी होईल हा प्रश्न प्रत्येक सुवासिनीला पडलेला असेल याच प्रश्नाच उत्तर आज आपण येता लेखातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणाला संक्रांती म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्याला मकर संक्रांती म्हटले जाते. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा विवाहसारख्या शुभ कार्ये केले जात नाहीत. त्यानंतर दरवर्षी मकर संक्रांतीला सूर्य धनू राशी सोडून मकर राशीत जातो. या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतात. दरवर्षी मकर संक्राती हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी होणार आहे.
मकर संक्रांतीचे महत्व...
मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, उपवास, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची आराधना या सर्व गोष्टींना विशेष महत्व दिले जाते. तसेच तिळ, गूळ आणि मिठाई या दिवशी वाटल्या जातात. तसेच मकर संक्रांतीला अनेक जण पतंदग देखील उडवतात.
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्त कोणता आहे?हिंदू दिनदर्शिकेनुसार 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी (रविवारी) साजरी केली जाईल. हे लक्षात की 14 जानेवारी रोजी रात्री 8.21 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल. या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला विशेष महत्व आहे. याशिवाय या दिवशी स्नान, तीळ आणि गूळ इत्यादी दान करण्याची परंपरा आहे. यावेळी मकर संक्रांती पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 07.15 ते दुपारी 12.30 पर्यंत असेल. एकूण कालावधी 05 तास 14 मिनिटे आहे, तर महापुण्य काल मुहूर्त 07:15 ते 9:15 पर्यंत असेल. याला एकूण कालावधी 2 तासांचा असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.