malshiraj wari ringan warkari rain monsoon culture vitthal rukmini purandawade
malshiraj wari ringan warkari rain monsoon culture vitthal rukmini purandawade sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : चिंब जाहला रिंगण सोहळा; टाळ मृदंगाचा गजर अन् ढगांचा गडगडाट

विलास काटे

माळशिरस : टाळ मृदंगाचा गगनभेदी गजर.... माउली-माउलीचा अखंड जयघोष...काळ्याभोर ढगांनी व्यापलेल्या आकाशात वरणराजाची बरसात...लाखो भाविकांची साक्ष...अशा अमाप उत्साहात माउलींच्या आणि स्वारांच्या अश्वांनी दोन फेऱ्या मारून रिंगण रंगविले. त्यानंतर उडीच्या खेळांत बरसलेल्या पावसाची अन् वारकऱ्यांची जणू जुगलबंदीच रंगली होती.

रिंगणात वारकऱ्यांसमवेत वरुणराजाही मनसोक्त नाचला. रिंगणानंतर पालखी रात्री माळशिरस मुक्कामी थांबली. नातेपुतेकरांचा निरोप घेऊन माउलींचा पालखी सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला. हरिनामाच्या गजरात सोहळा मांडवी ओढ्यावर नऊ वाजता थांबला.

आज ढगाळ हवामान असल्याने पावसाची चाहूल आणि पहिला रिंगण सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्ये सकाळपासूनच चैतन्य होतो. रिंगण असल्याने दिंड्यांमधील वारकरी सोडून अन्य मुक्त वारकरी पुढे रिंगणात जाऊन थांबले होते. झपाझप वाटचाल मागे टाकत साडेबाराच्या सुमारास पालखी सोहळा पुरंदावडे येथील रिंगणाजवळ आला.

रथापुढील दिंड्या एकामागोपाठ एक रिंगणात गोलाकार उभ्या राहिल्या. माउलींचा आणि स्वाराचा अश्व रिंगणात दाखल झाले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, धवलसिंह मोहिते पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले.

या वेळी सोहळाप्रमुख, अॅड. विकास ढगे, योगेश देसाई, अभय टिळक, मालक राजाभाऊ आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार हे उपस्थित होते.

दरम्यान, सकाळपासून थांबून राहिलेल्या पावसास सुरुवात झाली. सव्वा एक वाजता भोपळे दिंडीतील मानकऱ्यांनी रिंगणात तीन फेऱ्या मारल्यानंतर माउलींचा आणि स्वाराचा अश्व रिंगणात धावू लागले. माउली-माउली नामाचा एकच जयघोष झाला.

वेगात दोन फेऱ्या मारल्यानंतर अश्वांना माउलींच्या पालखीजवळ आणले. यावेळी अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडाली होती. दरम्यान भाविकांच्या गर्दीमुळे रिंगणात काही ठिकाणी रिंगणाचा आकार छोटा झाला होता.

दरम्यान, उडीचा डाव सुरू झाला, अन् काही काळ उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार बरसू लागला. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर आणि पावसाच्या ढगांचा गडगडाट यांच्या जुगलबंदी रंगली. पावसामुळे वारकऱ्यांमध्ये अधिकच चैतन्य संचारले. पावसामुळे वारकरी चिंब भिजून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT